एक्स्प्लोर

ना भाजप, ना काँग्रेस, या पक्षाला विधानसभा निवडणुकीत मिळाला पहिला विजय; गेल्या विधानसभा निवडणुकीत ठरला होता सर्वात तरुण आमदार

Election Results 2023 : राजकुमार रोट यांना एकूण 82081 मते मिळाली असून, मारे 70 हजार मतांनी त्यांचा विजय झाला आहे. 

Election Results 2023 : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे पहिले निकाल हाती आले आहेत. राजस्थानच्या चौरासी मतदारसंघातील पहिला विजयी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. या मतदारसंघातून राजकुमार रोट यांचा विजयी झाले आहेत. ते भारत आदिवासी पक्षाकडून निवडणुकीत उतरले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे (BJP) सुशील कटारा आणि काँग्रेसचे उमेदवार ताराचंद भगोरा यांचा पराभव केला आहे. राजकुमार रोट सुमारे 70 हजार मतांनी विजयी झाले आहे. 

राजस्थान विधानसभेच्या 199 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीचे निकाल समोर येत आहे. दरम्यान, राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यातील चौरासी विधानसभा मतदारसंघातून राजकुमार रोट यांनी मोठा विजय मिळवता आला आहे. यासह ते सलग दुसऱ्यांदा या जागेवरून आमदार झाले आहेत. भारतीय आदिवासी पक्षाचे राजकुमार रोट यांनी भाजपचे सुशील कटारा यांचा 47063 मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. राजकुमार रोट यांना एकूण 82081 मते मिळाली. तर कटारा यांना 35018 मतांवर समाधान मानावे लागले आहे. रोट यांच्या विजयानंतर परिसरातील नागरिक व कामगारांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.     

निवडणुकीपूर्वी नवा पक्ष स्थापन केला

राजकुमार रोट यांनी 2018 मध्ये निवडणूक भारतीय ट्रायबल पार्टी (BTP) च्या चिन्हावर लढवली होती. डुंगरपूर जिल्ह्यातील चौरासी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते पहिल्यांदाच आमदार झाले होते. पण, यावेळी राजकुमार रोट यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी नवा पक्ष स्थापन केला होता. विशेष म्हणजे रोट यांनी आपला नवीन पक्ष भारत आदिवासी पार्टी (बीएपी) या चिन्हावर निवडणूक लढवून विजय मिळवला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात तरुण आमदार ठरले होते

गरीब कुटुंबात जन्मलेल्या राजकुमार रोट यांच्या खांद्यावर लहानपणापासूनच कुटुंबाची जबाबदारी आली. पण, त्यांनी डुंगरपूर कॉलेजमधून बीए केले. बी.एड. कडून शिक्षण घेतले. रोट हे डुंगरपूर कॉलेजचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षही राहिले आहेत. भिल्ल विद्यार्थी मोर्चा असे त्यांच्या संघटनेचे नाव आहे. राजकुमार रोट यांचे स्वप्न शिक्षक होण्याचे होते. पण नशिबात काहीतरी वेगळंच होतं. 2018 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून आले. राजकुमार रोट यांनी चौरासी विधानसभा मतदारसंघातून बिट्टीपी पक्षाकडून निवडणूक लढवली होती.

कोण आहेत राजकुमार रोट?

राजकुमार रोट यांचा जन्म 26 मे 1992 रोजी डुंगरपूर जिल्ह्यातील खाखर खुनया गावात झाला. ते  आदिवासी आणि गरीब कुटुंबातून येतात. त्यांच्या वडिलांचे नाव शंकर लाल आणि आईचे नाव पार्वती आहे. लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणीच राजकुमारने आपल्या शेजारच्या लोकांमध्ये जागृती आणायला सुरुवात केली.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Rajasthan Election Result 2023: काँग्रेस सरकार टिकवण्यात यशस्वी होईल की भाजप वरचढ ठरणार? राजस्थान निवडणुकीचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

महत्त्वाच्या बातम्या

बॅलेटवर निवडणूक तरीही काँग्रेस पराभूत, आता केळाच्या पानावर निवडणूक घ्या अशीही मागणी करतील, भाजप आमदार परिणय फुकेंचा हल्लाबोल 
बॅलेटवर निवडणूक तरीही काँग्रेस पराभूत, आता केळाच्या पानावर निवडणूक घ्या अशीही मागणी करतील, भाजप आमदार परिणय फुकेंचा हल्लाबोल 
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget