Punjab Election Results 2022 LIVE: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. या निवडणुकीच्या निकालामध्ये पंजाबमध्ये (Punjab Election Result 2022 ) आतापर्यंत आम आदमी पार्टीने (AAP)मोठी आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. यामध्ये आप तब्बल 89 जागांवर आघाडीवर आहे. या विजयावर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
केजरीवाल यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, या सत्तांतरासाठी पंजाबच्या नागरिकांचं खूप खूप आभार मानतो. या ट्वीटमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्यासोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे.
पंजाबमधील आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला
पंजाबमधील आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. विजयाचं सेलिब्रेशन देखील आपनं सुरु केलं आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेस आतापर्यंत केवळ 12 जागांवर आघाडीवर आहे. तर अकाली दल 10 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर भाजप मात्र निष्प्रभ दिसून येत आहे.
काँग्रेसच्या हातून पंजाब का गेलं?
काँग्रेसच्या हातात असलेले हे राज्य हातातून जाण्याची अनेक कारणं आहेत. यामध्ये महत्वाचं म्हणजे क्रिकेटर आणि मूळचे भाजपवासी नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यापुढे आव्हान उभे केले. या दोघांमधून विस्तवही जात नसल्याने अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने लगेचच चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. अमरिंदर सिंह यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला असून भाजपसोबत युती करून निवडणुक लढवली. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन कमिटीचे मनजिंदर सिंह सिरसाही भाजपमध्ये सामिल झाले.
भाजपवर नाराजीचं कारण काय?
ऐतिहासिक शेतकरी आंदोलनातील पंजाबचा सहभाग जास्त होता. त्यामुळं भाजपवर लोकांची नाराजी सहाजिकच होती. याचा फटका भाजपला बसला. पंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसला बसला. याचा फायदा आपला झाल्याचं दिसून येत आहे. पंजाबमध्ये सत्ता आल्यास आपला सत्ता मिळालेलं हे दुसरं राज्य असेल. भगवंत मान हे आपचे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केले आहेत. पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये सत्ता येणार असल्याचा दावा अनेकदा केला होता. तसेच पंजाबमध्ये आपनं मोठी ताकत लावली होती. पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. मतदारांनी यावेळी समिश्र प्रतिसाद दर्शवल्याने 65.32 टक्के मतदानाची नोंद पंजाबमध्ये झाली होती. दरम्यान, निवडणुकांच्या निमित्ताने पंजाबमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी याठिकाणी प्रचार केला होता.
2017 मध्ये कुणाला किती मिळाल्या होत्या जागा? -
2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. 117 जागापैकी काँग्रेसने 77 जागावर विजय मिळवला होता. तर अकाली दल 15, भाजप 3 आणि आम आदमी पार्टीला 20 जागांवर विजय मिळाला होता. तर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली होती.
पंजाबमध्ये या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला?
चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस) - चमकोर साहिब
चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस) - भदौर
नवज्योत सिंह सिद्धू (काँग्रेस) - अमृतसर पूर्व
विक्रम मजिठिया (अकाली दल ) - अमृतसर पूर्व
भगवंत मान (आप) - धुरी
कॅ.अमरिंदर सिंह (पीएलसी) - पतियाळा शहर
प्रकाश सिंह बादल (अकाली दल) - लंबी
सुखबीर सिंह बादल (अकली दल) - जलालाबाद
सुखजिंदर रंधावा (काँग्रेस) - डेरा बाबा नानक
मालविका सूद (काँग्रेस) - मोगा
या ठिकाणी पाहा लाईव्ह निकालाचे अपडेट्स
https://marathi.abplive.com/live-tv/amp
https://twitter.com/abpmajhatv
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA
संबंधित बातम्या