Shivsena In Uttar Pradesh and Goa Election : महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्याचा निर्धार करणाऱ्या शिवसेनेचा पहिल्या दीड तासाच्या मतमोजणीत शिवसेनेच्या उमेदवारांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर फ्लॉप शो कायम असल्याची चर्चा आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभाही घेतली होती. सकाळी 10 वाजेपर्यंत शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान झाल्याचे दिसून आले. 


महाराष्ट्राबाहेर पक्ष विस्तार करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने शिवसेनेने गोव्यात आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उभे केले होते. शिवसेनेने काँग्रेससोबत युती करण्यासाठी बोलणीदेखील केली होती. मात्र, काँग्रेसने नकार दिल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली. तर, उत्तर प्रदेशात शिवसेनेने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. गोव्यात शिवसेनेने 10 उमेदवार उभे केले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने 13 उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे.


सकाळी 10 वाजेपर्यंत शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान झाल्याचे दिसून आले. शिवसेनेला 0.25 टक्के मतदान होते. राष्ट्रवादी काँग्रेसला 0.83 टक्के मिळाली. तर, नोटा पर्यायाला 1.20 टक्के मतदान मिळाले. उत्तर प्रदेशमध्येही शिवसेनेच्या उमेदवारांची सुमार कामगिरी राहिली. शिवसेनेच्या उमेदवारांना 0.02 टक्के मते मिळाली. तर, नोटा पर्यायाला 0.71 टक्के मते मिळाली.  


प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात 


शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली होती. गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी सभा घेतल्या. राज्याबाहेर शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभा घेणारे आदित्य हे ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती ठरले होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखणार? निवडणुकांचे अचूक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...