5 State Election Results 2022 LIVE: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येत आहेत. यामध्ये पंजाब (Punjab Election Results), गोवा (Goa Election Results), उत्तरप्रदेश (Uttar Pradesh Election Results), उत्तराखंड (Uttarakhand Election Results) आणि मणिपूर (Manipur Election Results) या पाच राज्यांचा समावेश आहे. संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले आहे. यात गोव्याच्या निकालाकडे महाराष्ट्राचं देखील विशेष लक्ष लागलेलं आहे. कारण गोव्याच्या निकालावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 


गोव्यात सुरुवातीचे सर्व कल हाती आले असून आतापर्यंत गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये घासून लढाई सुरु असल्याचं दिसतंय.सुरुवातींच्या कलांमध्ये भाजप 15, काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर आहे. तर मगोप-तृणमूल 7 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर चार जागांवर आघाडीवर आहेत. प्रतिष्ठेची लढाई केलेल्या शिवसेनेला मात्र या कलांमध्ये कुठंही स्थान नसल्याचं समोर आलं आहे. गोव्यातील निवडणूक शिवसेनेनं प्रतिष्ठेची बनवली होती. तसेच भाजपसह सर्व पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी गोव्यात प्रचाराची धुरा सांभाळली होती. भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या चांगलीच चुरस दिसून येत आहे. 


काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पिछाडीवर आहेत. सोबतच अपक्ष उत्पल पर्रिकर देखील पिछाडीवर आहेत. तर सुधीन ढवळीकर आघाडीवर आहेत. शिवसेनेने अद्याप खातंही उघडलेलं नाही.


उत्तरप्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप 200 च्या वर जागांवर आघाडीवर


उत्तरप्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप 200 च्या वर जागांवर आघाडीवर आहे तर समाजवादी पार्टी 80 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. पंजाबमध्ये आपनं चांगलीच मुसंडी मारल्याचं सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय. आप 45 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. सध्या काँग्रेस 17 तर भाजप 14 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय.


उत्तराखंडमध्ये 35 पेक्षा जास्त जागांवर भाजप तर काँग्रेस 20 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. मणिपूरमध्ये काँग्रेस आतापर्यंतच्या कलांमध्ये आघाडीवर असल्याचं दिसतंय.

( हे आकडे सकाळी 9.45 वाजेपर्यंतचे आहेत. काही वेळातच सर्व आकडेवारी स्पष्ट होणार आहे)


देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया


देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण 403 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे तिथे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कारण दिल्ली गाठण्याचा मार्ग युपीमधून जातो असे म्हटले जाते. त्यामुळे राजकीयदृष्ट्या यूपी हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. तसेच गोव्यात 40 जागांसाठी एकाट टप्प्यात, उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यात आणि पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते.


उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान झालं आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला तर मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान झालं. 





पाच राज्यांतील सर्व 690 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांचे अचूक निकाल पाहण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) results.eci.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करून निकाल पाहता येणार आहे. निवडणुकांचे  निकालाचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 


दरम्यान, एक्झिट पोलमधून उत्तराखंड आणि गोव्यात चुरशीच्या शर्यत पाहायला मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर बहुतेकांनी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या विजयाचा अंदाज व्यक्त केला आहे आणि यूपी आणि मणिपूरमध्ये भाजप विजयी होण्याची शक्यता आहे. एबीपी माझा आणि एबीपी माझा लाईव्ह टीव्हीवर सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही निवडणूक निकालांचे लाईव्ह अपडेट्स पाहू शकता. 

या ठिकाणी पाहा लाईव्ह निकालाचे अपडेट्स 


https://marathi.abplive.com/live-tv/amp 


https://twitter.com/abpmajhatv 


https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA