मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगानं आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. येत्या 31 मे रोजी राज्यातील मुंबई वगळता इतर 13 महापालिकांच्या आरक्षण सोडत कार्यक्रम होमार आहे. मुंबई महापालिकेच्या आरक्षणाची सोडत ही नंतर जाहीर करण्यात येणार आहे. 


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगानं सुरु केली आहे. महापालिकांची अंतिम प्रभाग रचना केल्यानंतर आता आरक्षणाची सोडत 31 मे रोजी काढण्यात येणार आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरारसह राज्यातील 13 महानगरपालिकांच्या निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या 31 मे रोजी होणार आहे. तर आरक्षण 13 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई महापालिकेची आरक्षणाची सोडत नंतर जाहीर होणार आहे.


राज्य निवडणुक आयोगाने आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांचं रणशिंग जवळ-जवळ फुंकल्यात जमा झालंय. राज्यात लवकरच नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यामधील 13 महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. 


राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून जोपर्यंत राज्य सरकार ओबीसी जनगणनेची त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागास वर्ग ( ओबीसी ) प्रवर्गासाठी प्रभाग राखीव ठेवता येत नाही . त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ओबीसींच्या आरक्षांशिवाय होणार आहेत हे स्पष्ट झाले आहे 


असा असेल कार्यक्रम?



  • आरक्षणाची नोटीस - 27 मे ला प्रसिद्ध होणार

  • जागा निश्चितीकरता आरक्षण सोडत - 31 मे

  • प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करणे - 1 जून

  • आरक्षणावर हरकती आणि सूचना मागवणे - 1 ते 6 जून

  • आरक्षण जाहीर करणे - 13 जून


महत्त्वाच्या बातम्या :