India vs Pakistan Asia Cup Hockey 2022 : भारतीय हॉकी संघाचा आशिया कप 2022 स्पर्धेतील (Heor Asia Cup 2022) पहिलाच सामना पाकिस्तान (India vs Pakistan) संघाविरुद्ध अनिर्णीत राहिला आहे. चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासून 1-0 ची आघाडी कायम ठेवली होती. पण अखेरच्या मिनिटांत पाकिस्तानने केलेल्या गोलमुळे सामना अनिर्णीत सुटला आहे. सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार कामगिरी झाली. भारताने सुरुवातीला घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली पण शेवटी मात्र पाकिस्तानने केलेल्या एका गोलमुळे सामना अखेर अनिर्णीत सुटला.
चुरशीच्या सामना अखेर अनिर्णीत
सामन्याच्या सुरुवातीला भारताकडून पहिला वहिला सामना खेळणाऱ्या 20 वर्षीय कार्ती सेल्वमने (Karti Selvam) अप्रतिम गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. सामना सुरु होताच काही वेळात सेल्वमने केलेल्या गोलच्या जोरावर भारताने 1-0 ची आघाडी घेतली. पहिल्या क्वॉर्टरमध्ये घेतेलेली ही आघाडी भारताने जवळपास अखेरपर्यंत कायम ठेवली. पण चौथ्या क्वॉर्टरमध्ये सामना संपण्याच्या जवळपास शेवटच्या मिनिटांला पाकिस्तानच्या अब्दुल राणाने (Abdul Rana) अप्रतिम गोल केला. पाकिस्तानला अखेरच्या क्षणांमध्ये मिळालेल्या पेनल्टीचा फायदा अब्दुलने घेत संघाला बरोबरीत आणलं.
भारताचा पुढील सामना जपानशी
आशिया कप 2022 मधील पूल ए मध्ये भारत आणि पाकिस्तानसोबत जपान आणि यजमान इंडोनेशिया देखील आहे. तर दुसरीकडे पूल बीमध्ये मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांग्लादेश हे संघ आहेत. दरम्यान भारतीय संघाचा आजचा सामना पाकिस्तानशी पार पडल्यानंतर आता उद्या अर्थात 24 मे रोजी भारत जपानशी लढणार आहे.
हे देखील वाचा-