एक्स्प्लोर

ECI : निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, विरोधी पक्षांचं जोरदार टीकास्त्र,निवडणूक आयोगाकडून एकाचं निलंबन, नेमकं काय घडलं?

ECI : भारत निवडणूक आयोगाच्या एका पत्रावर भाजपचा शिक्का आढळल्यानं मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. आयोगानं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगानं पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदूचेरी या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या दरम्यान निवडणूक आयोगाचं एक जुनं पत्र व्हायरल होत आहे. ज्यावर केरळ भाजपचा शिक्का आहे. या पत्रावरुन देशभरात मोठी चर्चा सुरु झाली आहे. माकपच्या केरळच्या अकाऊंटवरुन हे पत्र शेअर करत निवडणूक आयोगावर टीका करण्यात आली. यानंतर देशभरातील विविध राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. यानंतर वाद वाढू लागताच निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलं आहे. 

माकपनं एक पत्र शेअर केलं जे  19 मार्च 2019 च्या निवडणूक आयोगाचं होतं, ज्यावर केरळ भाजपचा शिक्का होता. हे पत्र शेअर करताना माकपनं विचारलं की निवडणूक आयोग आणि भाजप एकाच सत्ताकेंद्रातून चालतंय का? यानंतर काँग्रेसनं देखील निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केलं. भाजपचा शिक्का निवडणूक आयोगाकडे कसं पोहोचलं असा सवाल काँग्रेसनं केला.

निवडणूक आयोगाकडून चूक मान्य

निवडणूक आयोगानं म्हटलं की आम्हाला माहिती मिळाली आहे की भाजपचा शिक्का असलेलं एक पत्र मल्याळम वृत्तवाहिन्यांवरुन प्रसारित केलं जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयानं यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की ती क्लेरिकल चूक होती, जी लगेचच दुरुस्त करण्यात आली होती.  

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी म्हटलं की अबकी बार मोदी सरकार ही देखील याच प्रकारची क्लेरिकल चूक होती? तर, तृणमूल काँग्रेसनं म्हटलं की निवडणूक आयोग भाजपची बी टीम झाला आहे, हे अधिकृतपणे स्पष्ट झालं आहे. टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी निवडणूक आयोानं पहिल्यांदा भाजपचा शिक्का असलेलं अधिकृत पत्र जारी करण्याचं धाडस दाखवलं होतं. ज्ञानेश कुमार यांनी अशाच प्रकारची पत्र यापुढेही जारी करावीत, लोकशाही जिंदाबाद असं म्हटलं.  

निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना पाठवलेल्या पत्रावर केरळ भाजपचा शिक्का होता. ही चूक नसून गंभीर विषय आहे. यामुळं संविधानिक संस्थांची निष्पक्षता आणि विश्वसनीयतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. निवडणूक आयोगाच्या अधिकृत पत्रावर भाजपचा शिक्का कसा मारला गेला. निवडणूक आयोगानं भारताच्या जनतेला स्पष्टीकरण द्यावं, असं काँग्रेसनं म्हटलं. 

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. या प्रकरणाशी संबंधित असिस्टंट सेक्शन अधिकाऱ्याला चौकशी सुरु असेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. केरळच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं म्हटलं की ही पूर्णपणे क्लेरिकल चूक होती. केरळ भाजपनं काही दिवसांपूर्वी एक जुन्या नियमावलीची प्रत जमा केली होती. ज्यावर त्यांचा शिक्का होता, जी चुकीनं इतर पक्षांना पाठवण्यात आली.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget