Election 2022 Voting Live : निवडणुकीचा रणसंग्राम! पंजाबसह यूपीत तिसऱ्या टप्प्याचं मतदान, पाहा प्रत्येक अपडेट्स

Elections 2022 Voting Live Uttar Pradesh Punjab :तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 16 जिल्ह्यांमधील 59 जागांसाठी मतदान होणार आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये देखील आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Feb 2022 07:40 AM
Elections 2022 Voting : उत्तर प्रदेशात 57.44 टक्के, तर पंजाबमध्ये 63.44 टक्के मतदान

उत्तर प्रदेशात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.44% टक्के मतदान झाले आहे. तर पंजाबमध्ये 63.44% टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 

Election 2022 Voting Live : एक वाजेपर्यंत पंजाबमध्ये 34 टक्के तर यूपीमध्ये 35 टक्के मतदान, सोनू सूदनं अकाली दलावर केला धमकावल्याचा आरोप

Election 2022 Voting Live : एक वाजेपर्यंत पंजाबमध्ये 34 टक्के तर यूपीमध्ये 35 टक्के मतदान, सोनू सूदनं अकाली दलावर केला धमकावल्याचा आरोप 

Election 2022 Voting Live : EVM वरुन निवडणूक चिन्ह गायब झाल्याचा समाजवादी पक्षाचा दावा 

 EVM वरुन निवडणूक चिन्ह गायब झाल्याचा समाजवादी पक्षाचा दावा 



समाजवादी पार्टी (SP) नं ट्वीट करत म्हटलं आहे की,  फर्रुखाबाद जिल्ह्यातील विधानसभा 194 बूथ 38 वरील  EVM वरुन त्यांचं निवडणूक चिन्ह गायब झालं आहे.  


 



UP Punjab Election Live : अखिलेश यादवांनी जसवंतनगरमध्ये केलं मतदान


UP Punjab Election Live : अखिलेश यादवांनी जसवंतनगरमध्ये केलं मतदान







 

UP Punjab Election Live : सकाळी 11 वाजेपर्यंत पंजाब विधानसभा निवडणुकीत 17.77% टक्के तर उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात 21.18 टक्के मतदान 




UP Punjab Election Live : सकाळी 11 वाजेपर्यंत पंजाब विधानसभा निवडणुकीत 17.77% टक्के तर उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात 21.18 टक्के मतदान 








 


Punjab UP Election 2022 : सकाळी 9 वाजेपर्यंत पंजाबमध्ये 4.80 टक्के मतदान तर उत्तर प्रदेशमध्ये 8.15 टक्के मतदान  

Punjab UP Election 2022 : सकाळी 9 वाजेपर्यंत पंजाबमध्ये 4.80 टक्के मतदान तर उत्तर प्रदेशमध्ये 8.15 टक्के मतदान  

Punjab Election 2022: भगवंत मान यांनी केलं मतदान


Punjab Election 2022: भगवंत मान यांनी केलं मतदान

पंजाब: आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेजवार भगवंत मान यांनी मोहालीमध्ये मतदान केलं 







 

गृहमंत्री अमित शाह यांच्याकडूनही मतदान करण्याचं आवाहन

पंजाबचा सुवर्ण आणि गौरवशाली इतिहास आहे. ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. मी पंजाबच्या मतदारांना आवाहन करतो की, राज्य सुरक्षित ठेवा आणि सांस्कृतिक वारसा आणि गुरूंची समृद्ध परंपरा पुढे ठेवा. पंजाब आणि देशाला एकसंध ठेवणारे सरकार निवडण्यासाठी आज मतदान करा, असे आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.





पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्वीट करत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदीकडून ट्वीट करत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन

Election 2022 : पंजाबमध्ये आज सर्वच 117 जागांसाठी मतदान होत आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्येही तिसऱ्या टप्प्यातील 59 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे मतदारांना आवाहन केले आहे. विशेषत: तरुणांना आणि प्रथमच मतदान करणाऱ्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्वीट करत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. उत्तर प्रदेशला कुटुंबवाद, जातिवादापासून मुक्त करण्यासाठी विकासाला गती देणाऱ्या सरकारला निवडून देण्यासाठी तुमचे मत अत्यंत महत्त्वाचे असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. तर पंजाबला सुरक्षीत ठेवण्यासाठी राज्याला एकसंध ठेवणारे सरकार निवडा असे देखील शाह यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी केलं मतदान

Elections 2022 Voting Live: उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील 59 जागांसाठी मतदान सुरु; पंजाबच्या सर्व 117 जागांसाठी मतदान

Elections 2022 Voting Live: उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील 59 जागांसाठी मतदान सुरु;  पंजाबच्या सर्व 117 जागांसाठी मतदान

पंजाबमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात

पंजाबमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार असून, सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून, सायंकाळी  6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पंजाबमधील सर्वच 117 जागांसाठी आज मतदान

पंजाबमध्ये देखील आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. पंजाबमधील सर्वच 117 जागांसाठी आज मतदान होणार आहे. 

उत्तर प्रदेशमधील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज

Election 2022 : उत्तर प्रदेशमधील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज (20 फेब्रुवारी) पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 16 जिल्ह्यांमधील 59 जागांसाठी मतदान होणार आहे. 

पार्श्वभूमी

Election 2022 : उत्तर प्रदेशमधील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज (20 फेब्रुवारी) पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 16 जिल्ह्यांमधील 59 जागांसाठी मतदान होणार आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये देखील आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. पंजाबमधील सर्वच 117 जागांसाठी आज मतदान होणार आहे. पंजाबमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार असून, सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून, सायंकाळी  6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


उत्तर प्रदेशमध्ये या तिसऱ्या टप्प्यात 2 कोटी 15 लाख 75 हजार 430 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 कोटी 16 लाख 12 हजार 010 पुरुष मतादर तर 99 लाख 62 हजार 324 महिला मतदारांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये 627 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर पंजाबमध्ये 117 जागांसाठी 1 हजार 304 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंजाबमध्ये 2.14 कोटी लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 


पंजाबमध्ये यावेळी काँग्रेस, आप, शिरोमणी अकाली दल-बसपा युती, भाजप-पीएलसी-शिरोमणी अकाली दल (युनायटेड) आणि विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेला संयुक्त समाज मोर्चा या पक्षांमध्ये लढत होणार आहे. काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. 
सत्ताधारी काँग्रेसला ड्रग्ज आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी या निवडणुकीत जोरदार निशाणा साधला आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 58 जागांवर 10 फेब्रुवारीला आणि दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारीला 55 जागांवर मतदान पूर्ण झालं आहे. यूपीमध्ये सातव्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. 10 मार्चला निकाल लागणार आहे.


यूपीमध्ये तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 16 जिल्ह्यांतील 59 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये मैनपुरी जिल्ह्यातील करहल विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. येथून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री प्राध्यापक एसपी सिंह बघेल आणि प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आमने सामने आहेत.


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.