Eknath Shinde on Arvind Sawant : भारतीय जनता पक्षाने मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून शायना एनसी यांना उमेदवारी दिली आहे. तर शायना एनसी यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाने अमिन अमीरअली पटेल पुन्हा एकदा मैदानात उतरवलं आहे. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचार करत असताना ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. "त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो.” असं खासदार अरविंद सावंत म्हणाले होते. त्यानंतर शायना एनसी चांगल्याच संतापल्या. त्यांनी पोलीस ठाण्यात या वक्तव्यावरुन तक्रार दाखल केली आणि अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
बाळासाहेब असते तर अशा नेत्यांचं थोबाड फोडलं असतं : एकनाथ शिंदे
दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, शायना एनसीबाबत जे विधान केलंय त्यांचा निषेध करतो. बाळासाहेब असते तर अशा नेत्यांचं थोबाड फोडलं असतं. लाडक्या बहिणीच्या बाबत असं विधान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी अरविंद सावंतांना सुनावलं आहे.
अरविंद सावंतांचं स्पष्टीकरण, म्हणाले; कायदेशीर कारवाईला सामोरे जावू
अरविंद सावंत म्हणाले, पोलिसांचं कौतुक नोटीस न देता गुन्हा दाखल केलाय. पोलीस स्थानकात गोळी झाडली गेली, ठाण्यात अत्याचार झाला, महिला पत्रकाराला बोलले काय गुन्हा दाखल झाला? सत्तेत असाल तर काही करा, गुन्हा दाखल होणार नाही.मला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचलं गेलंय. ती माझी मैत्रिण होती, मी तिचा अपमान कशाला करेल. ही ढोंगी लोकं आहेत. तुमच्या पक्षात सत्तेत असाल तर काहीही करा असं आहे. तुम्हाला एथिक्स नाहीत. तुम्ही भ्रष्ट लोकं आणि ते आरोप करतात तेव्हा वाईट वाटतं. काहीच नाही करता येत अरविंद सावंत वर मग त्यालाच बदनाम करा. नोटीस न देता एफआयआर दाखल कसं करु शकतात? संजय राठोडांविरोधात गप्प का राहिलात? ऐन निवडणुकीत यांचा काही वापर करता येईल का? म्हणून सर्व आहे हे.. ही सर्व मोदींची चेले मंडळी आहेत. कायदेशीर कारवाईला सामोरे जावू.
इतर महत्त्वाच्या बातम्या