Shaina NC Vs Arvind Sawant : अरविंद अप्रत्यक्षपणे शिंदे गटाच्या नेत्या  शायना एनसी यांचा 'इम्पोर्टेड माल' असा उल्लेख केल्यानंतर गदारोळ सुरु झाला आहे. शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शायना एनसी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीचा उल्लेख महाविनाश आघाडी करत शायना एनसी यांनी जोरदार हल्लाबोल केला.  


काय म्हणाले होते अरविंद सावंत?


एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी शिवसेना नेत्या शाइन एनसी यांच्यावर निशाणा साधला आणि सांगितले की, त्यांची अवस्था बघा, त्या आयुष्यभर भाजपमध्ये राहिल्या आता दुसऱ्या पार्टीत गेल्या आहेत. इथं 'इम्पोर्टेड माल'  चालत नाही, फक्त ओरिजनल माल येथे चालतो. त्यांच्या वक्तव्यावर मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांनी पलटवार करत माफी मागण्याची मागणी केली. "ते स्त्रीचा आदर करू शकत नाहीत," असे त्या म्हणाल्या. 


मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार


शायना म्हणाल्या की, "2014 आणि 2019 मध्ये पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली तुमच्यासाठी काम केले." एका महिलेला 'माल' म्हटल्याने आता ते अडचणीत येणार आहेत. जनता त्यांना जागा दाखवेल, त्यांची विचारधारा स्पष्ट आहे. त्यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, तुम्हाला माफी मागावी लागेल. ही महाविनाश आघाडी आहे. अरविंद सावंत बोलत असताना काँग्रेसचे आमदार अमीन पटेल हसत होते. मी पोलीस स्टेशनला जात आहे. मी मुंबई पोलिसांकडे तक्रार करणार असून निवडणूक आयोगाकडेही तक्रार करेन. तुम्हाला माफी मागावी लागेल.


काय म्हणाले भाजप?


अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, महिलांचा सन्मान केला पाहिजे. अशा प्रकारची टिप्पणी निषेधार्ह आहे. राजकारणात महिलांचा सन्मान झाला पाहिजे. शायना एनसी यांनी 28 ऑक्टोबर रोजी भाजप सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे यांनी त्यांना मुंबादेवीतून उमेदवारी दिली आहे.  मुंबादेवी जागेवर काँग्रेसचे उमेदवार अमीन पटेल यांच्या विरोधात शायना एनसी निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत हेही त्यांच्या उमेदवारी सभेला उपस्थित होते. यावेळी सावंत यांनी भाष्य केले. यावरून वाद निर्माण झाला आहे. शायना एनसी वरळीतून निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला जात होता, मात्र शिवसेनेने वरळीतून राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांना तिकीट दिले आहे. या जागेवर त्यांची लढत उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्याशी आहे.


इतर महत्वाच्या बातम्या