मुंबईचा महापौर महायुती, हिंदू, मराठीच होणार; देवेंद्र फडणवीसांचा मुंबईतूनच एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
मुंबईचा महापौर महायुती, हिंदू आणि मराठीच होणार असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुती, हिंदू आणि मराठीच होणार असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पण परवा वारीस पठाण बोलून गेले बुरखेवाली मेयर बनेगी, मात्र सकाळचा भोंगा त्यावर बोलेना असा टोला फडणवीस यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना लगावला. एक जणही त्यावर बोलायला तयार नाही. आम्हालाच चार्ज करावं लागेल आणि सांगावं लागेल महापौर हिंदूच बनेल आणि मराठीच बनेल असे फडणवीस म्हणाले. आमचं धर्माशी वैर नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
वंदे मातरम म्हणायला नकार देतात त्याला आमचा विरोध
वंदे मातरम म्हणायला नकार देतात त्याला आमचा विरोध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. माहिम दर्गावर सांगितलं तेव्हा मी चादर चढवली आणि तिरंगा फडकवला असे मुख्यमंत्री म्हणाले. भारताशी दुश्मनी असलेल्यांना सोडणार नाही असेही ते म्हणाले. तिकडच्या सभेत तुम्हाला वंदे मातरम् ची घोषणा दिसणार नाही. बांगलादेशी मागील 6 ते 7 महिन्यात आम्ही परत पाठवले. बंगालमधून आलेला ममता दीदींच्या आशीर्वादाने आलेला बंगलादेशी परत पाठवू आणि हे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठी माणूस हद्दपार झाला पाप कोणाचं?
मराठी माणूस हद्दपार झाला पाप कोणाचं? गिरणी कामगार हद्दपार झाला कोणामुळे? फिक्स्ड डिपॉझिटच्या रसिदी चाटायच्या का? असे सवाल मुख्यमंत्र्यांनी केले. दोन हजार कोटी जरी काढले असते तरी गिरणी कामगार वाचला असता. बीडीडी चाळ आम्ही निर्माण केली, 80 हजार लोकं वाट बघत होते, मात्र यांनी बिल्डर्सच्या नादात सत्यानाश केला. आम्ही निर्णय केला स्वत: म्हाडा बांधेल आणि आज इमारती उभ्या करत चाव्या दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
यापुढे मुंबईतला मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही
पत्राचाळीचा तुम्ही घोटाळा केला. तिथल्या लोकांना बेघर केलं, अशी टीका देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर केली. मात्र आम्ही त्याला घर दिलं. यापुढे मुंबईतला मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही असेही ते म्हणाले. मोठं घर त्याला देऊ आणि स्वप्न पूर्ण करु असेही ते म्हणाले. मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील लोकांना घर देऊ. महायुतीच्या सरकारनं एसआरएच्या माध्यमातून घरं दिल्या, योजना आपल्या अजूनही सुरु आहेत. घरांचा प्रश्न आम्ही सोडवत आहोत असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दुसरा प्रश्न दळणवळणाचा आहे, वाहतुकीचा आहे. मुंबईकरांना इज ऑफ लिव्हींगसाठी मेट्रो जाळे तयार करत आहोत. मुंबईकरांचा वाहतुकीत अडकून पडावं लागणार नाही. टनेलचं जाळं तयार आम्ही करतो आहोत. हे करत असताना पर्यावरणपूरक मुंबई तयार करणे. सांडपाणी समुद्रात जात होतं, एसटीपी मुंबईत नव्हते.70 हजारांचे कागदं फक्त होते. 16 हजार कोटींचे एसपीटी आपण निर्माण करतोय. घाणेरडा वास आपल्याला येतो तो त्यामुळे येणार नाही, हे आपण करुन दाखवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.





















