एक्स्प्लोर

अपक्षांवर अविश्वास दाखवणे चुकीचं, विधानपरिषद निवडणुकीत विचार करावा लागेल : देवेंद्र भुयार

Devendra Bhuyar On Sanjay Raut : देवेंद्र भुयार आज अपक्षांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तसेच संजय राऊतांसंदर्भात बोलण्यासाठी शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्यासाठी निघाले आहेत.

Devendra Bhuyar On Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल ज्या अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर गद्दारी केल्याचा आरोप केला होता. तेच देवेंद्र भुयार आज अपक्षांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तसेच संजय राऊतांसंदर्भात बोलण्यासाठी शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्यासाठी निघाले आहेत. याआधी एबीपी माझाशी बोलताना देवेंद्र भुयार यांनी म्हटलं की, आम्ही संजय राऊत यांच्या पक्षातून निवडून आलेलो नाही. मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सोबत राहून निवडून आलो आहे, मग मी गद्दारी कशी केली असा त्यांनी सवाल केला आहे. 

आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे की, मी संजय राऊत यांच्या पूर्वीपासून आघाडीपासून जोडलेला आहे. मी लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करत असून संजय राऊत आणि त्यांचा पक्ष तर विधानसभा निवडणुकीनंतर आघाडीसोबत आला. विश्वास मताच्या वेळेलाही महाविकास आघाडी सरकारला मतदान केलं होतं. गद्दारी करायची असती तर तेव्हाच केली असती, असं ते म्हणाले.

देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे की, संजय राऊत यांचा चुकतंय, ते खूप मोठे नेते आहेत. मात्र असा आरोप करणे योग्य नाही. आपण पहिल्या पसंतीचं मत संजय पवार आणि दुसऱ्या पसंतीचं मत संजय राऊत यांना दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मुळात शिवसेनेचं नियोजन चुकलं, शिवसेनेचे उमेदवार आणि आम्हाला फक्त हॉटेलमध्ये भेटले. एक फोन सुद्धा केलेला नाही असे भुयार म्हणाले. मला अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी ज्या सूचना केल्या त्याप्रमाणे मतदान केल्याचा दावा त्यांनी केला. आज शरद पवारांना भेटून सांगणार की प्रामाणिकपणे मतदान करून ही या पद्धतीने आमची बदनामी केली जाणार असेल तर हे योग्य नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार सोबत आहोत. आम्ही लोकांमधून निवडून आलेले आहे.. त्यामुळे आमच्याबद्दल असा गैरसमज निर्माण करणे योग्य नाही,असं भुयार म्हणाले.

भुयार यांनी म्हटलं आहे की, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच अपक्षांना एकत्रित येऊन एक भूमिका घ्यावी लागेल. विचार करावा लागेल.  हा एकट्या अपक्षावर दाखवलेला अविश्वास नाही. तर सर्व अपक्षांवर दाखवलेला अविश्वास आहे. मी भाजपला मतदान कधीच करणार नाही, असंही ते म्हणाले. 

देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे की,  मुख्यमंत्री कधीच भेटत नाहीत. अनेक पत्र लिहूनही उत्तर देत नाही. हे आम्ही मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं आहे. मतदारसंघाची काम आम्ही राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना नाही तर मग काय पंतप्रधान मोदींनी जाऊन सांगणार का? मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नाहीत ही आमची खंत आहे, असंही भुयार म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि महायुतीच्या स्मिता जाधवांची कांटे की टक्कर
पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि महायुतीच्या स्मिता जाधवांची कांटे की टक्कर
Amravati Election Result 2026: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा शिलेदाराची विजयी घोडदौड कायम! किरण सरनाईकांसमोर काँग्रेसच्या आदिती पोहरेंच आव्हान, 24 तासांपासून मतमोजणी, कोण मारणार बाजी?
अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा शिलेदाराची विजयी घोडदौड कायम! किरण सरनाईकांसमोर काँग्रेसच्या आदिती पोहरेंच आव्हान?मतमोजणीचा दुसरा दिवस उजाडला, निकालची उत्कांठा शिगेला
'मैं खडा तो सरकारसे बडा...', म्हणणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना पुणे शिक्षक निवडणुकीत फक्त 19 मतं, पण पदवीधरमध्ये अजून आव्हान कायम
'मैं खडा तो सरकारसे बडा...', म्हणणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना पुणे शिक्षक निवडणुकीत फक्त 19 मतं, पण पदवीधरमध्ये अजून आव्हान कायम
Nagpur MLC Election 2026: नागपूरच्या मतमोजणीत जबरदस्त ट्विस्ट; भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, दिग्गजांच्या लढतीत कराळे मास्तर जायंट किलर ठरणार?
नागपूरच्या मतमोजणीत जबरदस्त ट्विस्ट; भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, दिग्गजांच्या लढतीत कराळे मास्तर जायंट किलर ठरणार?

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Thane Crime: एकनाथ शिंदेंनी 17 लाखात मांडवली करायला माणूस पाठवला होता, प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा खळबळजनक आरोप
एकनाथ शिंदेंनी 17 लाखात मांडवली करायला माणूस पाठवला होता, प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा खळबळजनक आरोप
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: 22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Nagpur MLC Election Result 2026: कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
Embed widget