एक्स्प्लोर

औरंगाबादच्या जागेवरुन काँग्रेसमधील नाराजीनाट्य थांबेना, पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार

काँग्रेसने औरंगाबादमध्ये निवडून येणारा खासदार घ्यायला हवा होता ,पण तसं काही झालं नाही .आणि त्यामुळेच आम्ही हे पाऊल उचलत असल्याची प्रतिक्रिया देखील रामकृष्ण बाबा पाटील यांनी दिली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील नाराजीनाट्य काही  थांबण्याचं नाव घेत नाही. अब्दुल सत्तार यांच्या बंडाळीनंतर औरंगाबाद येथील काँग्रेस कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी ही माहिती दिली आहे. VIDEO | अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांना भेटले, काँग्रेसवर दबाव की खरोखर भाजपच्या वाटेवर? | एबीपी माझा येत्या दोन दिवसात काँग्रेसने औरंगाबादेतील उमेदवारी बदलावी अन्यथा आम्ही राजीनामे देऊ ,असा इशारा त्यांनी पक्षाला दिला  आहे. काँग्रेसने औरंगाबादमध्ये निवडून येणारा खासदार घ्यायला हवा होता ,पण तसं काही झालं नाही आणि त्यामुळेच आम्ही हे पाऊल उचलत असल्याची प्रतिक्रिया देखील रामकृष्ण बाबा पाटील यांनी दिली आहे. अब्दुल सत्तार अपक्ष निवडणूक लढवणार, मध्यरात्री घेतली मुख्यमंत्र्यांची भेट दरम्यान त्याआधीच लोकसभेच्या तिकीटावरुन नाराज असलेल्या काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी रात्री 1.30 च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. तसेच आपण औरंगाबाद लोकसभेमधून अपक्ष निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीबाबत बोलताना सत्तार म्हणाले की, मी विरोधी पक्षाचा आमदार असूनही गेल्या साडेचार वर्षांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी मदत केली आहे. म्हणूनच काल रात्री मी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच यावेळी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मी औरंगाबादमधून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहे. भारतीय जनता पक्षात सुरू असलेल्या इन्कमिंगमध्ये अब्दुल सत्तारांचे नाव सहभागी होणार का? याबाबत चर्चा सुरु आहे. याबाबत सत्तार म्हणाले की, मी भारतीय जनता पक्षात जाणार नाही. मी काल केवळ मुख्यमंत्र्यांची सदिच्छ भेट घेतली होती. दरम्यान, औरंगाबाद लोकसभा तिकीट वाटपावरुन काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली होती. त्यामुळे काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या घोषित उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारले आहे. सुभाष झांबड यांना पक्षाने दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचे सांगत स्वतः लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उभे राहणार असल्याचे सत्तार त्यांनी म्हटले आहे. सत्तार यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. याबाबत ते म्हणाले की, यापूर्वीच मी माझा राजीनामा दिला आहे. तीस वर्ष पक्षाची सेवा केल्यानंतर पक्ष लोकसभेचे तिकीट देईल, असे मला वाटत होते, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. VIDEO | अशोक चव्हाणांना हायकमांड जुमानत नाही का? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget