एक्स्प्लोर

दारू पिण्याची इच्छा झाली, तर भाजपवाल्यांनी पाठवलेली दारू प्या, मात्र मत काँग्रेसलाच द्या! काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा वादग्रस्त सल्ला

Nagpur Assembly Election 2024 : भाजपवाले भ्रष्टाचाराच्या पैशाने निवडणूक लढवत आहेत, त्यांनी पैसे दिले तर घ्या पण मत काँग्रेसलाच द्या असं वक्तव्य काँग्रेसचे नागपूर मध्यचे उमेदवार बंटी शेळके यांनी केलं.

नागपूर : जर तुमची दारू पिण्याची इच्छा झाली, तर भाजपवाल्यांनी तुमच्या घरी पाठवलेली दारू घ्या, मात्र मत काँग्रेसला (Congress) द्या. जर तुम्हाला त्यांच्याकडून भ्रष्टाचाराचा पैसा घेण्याची इच्छा झाली, तर तुम्ही तो ही घ्या, मात्र मत काँग्रेसला द्या. नागपुरात शेकडो मतदारांच्या उपस्थितीत काँग्रेस उमेदवाराने असा वादग्रस्त सल्ला दिला आहे. मध्य नागपुर मधील काँग्रेस उमेदवार बंटी शेळके (Bunty Shelke) यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 

मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात (Central Nagpur Assembly Constituency) रविवारच्या संध्याकाळी बंटी शेळके यांच्यासाठी प्रियंका गांधी यांनी रोड शो केलेत. त्या रोड शोच्या पूर्वी बंटी शेळके यांनी रोडशो साठी आलेल्या शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि मतदारांसमोर भाषण केले. बंटी शेळके यांच्या या भाषणाच्या वेळेला प्रियंका गांधी रोड शोच्या ठिकाणी पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे  त्यांच्या येण्यापूर्वी हे भाषण झाले. त्यावेळी बोलताना बंटी शेळके म्हणाले की, भाजपवाले भ्रष्टाचाराचे पैशातून ही निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे खूप पैसा आहे. त्यामुळे ते तुमच्या घरी आमिष म्हणून दारू घेऊन आले आणि तुमची ती पिण्याची इच्छा झाली, तर ती दारू तुम्ही घेऊन घ्या. जर भाजपवाले त्यांच्या भ्रष्टाचाराचा पैसा घेऊन तुमच्या घरी आले, तर तुम्ही तेही घेऊन घ्या. मात्र मत काँग्रेसला द्या, असे बंटी शेळके म्हणाले. माझ्याकडे लोकांना वाटण्यासाठी पैसा नाही. मी दुचाकी वर चालणारा नेता आहे आणि भविष्यातही दुचाकीवालाच राहील, असं ही बंटी शेळके या भाषणात म्हणाले.

शब्दश काय म्हणाले काँग्रेस उमेदवार बंटी शेळके 

मी दारू पीत नाही, दारू पिणे चुकीचे आहे, त्याने लिव्हर खराब होतो.  मात्र भाजप वाले पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत आहेत. पाचशे कोटींची निवडणूक ते लढवत आहेत. ते मतदारांना सोन्याचे दागिने देत आहेत. भाजपवाले तुमच्या घरी दारू देण्यासाठी आले आणि जर तुमची दारू प्यायची इच्छा झाली, तर तुम्ही ती दारू घ्या. मात्र, त्यानंतर ही मत काँग्रेसला द्या. मी तर पैसा वाटू शकत नाही. मात्र त्यांच्याकडे भ्रष्ट मार्गाचा खूप पैसा आहे. मात्र जर तुमची इच्छा त्यांच्याकडून तो पैसा घेण्याची झाली. तर ते ही घेऊन घ्या. मात्र मत काँग्रेसला द्या. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही लढाई आहे. आमच्याकडे पैसा  नाही. माझा घर आजही कच्च आहे. माझ्याकडे दुचाकी आहे. नगरसेवक असूनही माझ्याकडे दुचाकीच राहिली आहे. मी आज ही दुचाकी वर आहे आणि उद्याही दुचाकी वरच राहणार. असं ही बंटी शेळके या भाषणात म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime : बीडचे पालकमंत्रिपद अजितदादांनी घ्यावं, म्हणजे अंधारात कोण काय करतंय हे समजेल; बजरंग सोनवणेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
बीडचे पालकमंत्रिपद अजितदादांनी घ्यावं, म्हणजे अंधारात कोण काय करतंय हे समजेल; बजरंग सोनवणेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
K Annamalai : कडाक्याच्या थंडीत भाजप नेता अर्धनग्न, शरीरावर सपासप चाबकाचे फटके मारुन घेतले! तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार
Video : कडाक्याच्या थंडीत भाजप नेता अर्धनग्न, शरीरावर सपासप चाबकाचे फटके मारुन घेतले! तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार
Manmohan Singh : मनमोहन सिंग कधी आणि कसे प्रेमात पडले? मनमोहन सिंग यांची गुरशरण कौर यांच्याशी पहिली भेट
मनमोहन सिंग कधी आणि कसे प्रेमात पडले? मनमोहन सिंग यांची गुरशरण कौर यांच्याशी पहिली भेट
Lamborghini Video Viral : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Video : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 27 डिसेंबर 2024: ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 27 December 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सSharad Pawar On Manmohan Singh News : संकट काळात मनमोहन सिंग यांनी देशाला दिशी दिली- शरद पवारABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 December 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : बीडचे पालकमंत्रिपद अजितदादांनी घ्यावं, म्हणजे अंधारात कोण काय करतंय हे समजेल; बजरंग सोनवणेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
बीडचे पालकमंत्रिपद अजितदादांनी घ्यावं, म्हणजे अंधारात कोण काय करतंय हे समजेल; बजरंग सोनवणेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
K Annamalai : कडाक्याच्या थंडीत भाजप नेता अर्धनग्न, शरीरावर सपासप चाबकाचे फटके मारुन घेतले! तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार
Video : कडाक्याच्या थंडीत भाजप नेता अर्धनग्न, शरीरावर सपासप चाबकाचे फटके मारुन घेतले! तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार
Manmohan Singh : मनमोहन सिंग कधी आणि कसे प्रेमात पडले? मनमोहन सिंग यांची गुरशरण कौर यांच्याशी पहिली भेट
मनमोहन सिंग कधी आणि कसे प्रेमात पडले? मनमोहन सिंग यांची गुरशरण कौर यांच्याशी पहिली भेट
Lamborghini Video Viral : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Video : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Sharad Pawar on Manmohan Singh : स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
Mamata Machinery IPO : ममता मशिनरीच्या आयपीओचं धमाकेदार लिस्टींग, 243 चा स्टॉक पोहोचला 630 रुपयांवर, गुंतवणूकदारांची मोठी कमाई
ममता मशिनरीचे गुंतवणूकदार मालामाल, आयपीओ लिस्ट होताच लागलं अप्पर सर्किट, शेअर बनला रॉकेट 
Budget 2025 : प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
Beed : धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी सुरेश धसांनी सुपारी घेतली, 'त्या' सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्या: बीड प्रकरणावर अमोल मिटकरी काय म्हणाले? 
धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी सुरेश धसांनी सुपारी घेतली, 'त्या' सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्या: बीड प्रकरणावर अमोल मिटकरी काय म्हणाले? 
Embed widget