एक्स्प्लोर
Advertisement
काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचं नागरिकत्त्व काढून घेतलं होतं, नरेंद्र मोदींचा आरोप
"काँग्रेसने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नागरिकत्त्व हिसकावून घेतलं होतं तसेच त्यांचा मतदानाचा अधिकारही काढून घेतला होता", असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.
औसा : "काँग्रेसने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नागरिकत्त्व हिसकावून घेतलं होतं तसेच त्यांचा मतदानाचा अधिकारही काढून घेतला होता", असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर निशाणा साधला. " काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचं कलम रद्द करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पाकिस्तानचा सूर दिसतो आहे. सैनिकांचे विशेष अधिकार काढून घेण्याबाबतची काँग्रेसची भूमिका देखील पाकिस्तानला पुरक आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी काँग्रेस देशविरोधी आहे असं सांगताना मोदींनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला. 'काँग्रेसने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता', असा आरोप त्यांनी केला.
वादग्रस्त प्रचारामुळे जुलै 1999 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा आणि निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला होता. त्यानंतर बाळासाहेबांनी 2006 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावला होता.
VIDEO | लातूरच्या औसा येथे महायुतीची जाहीर सभा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण | लातूर | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
बीड
भारत
Advertisement