ईव्हीएम मान्य केलं तर खचलेल्या मनस्थितीत निवडणुका लढाव्या लागतील, म्हणून ईव्हीएमच्या आड मविआचा केविलवाणा प्रयत्न : चंद्रशेखर बावनकुळे
कार्यकर्त्यांची मानसिक अवस्था हरलेली राहू नये म्हणून शरद पवार आणि उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसाठी बुस्टअप करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआला लगावला आहे.
Chandrashekhar Bawankule : शरद पवारांना भीती आहे की आपली पार्टी अर्धी होईल, येणाऱ्या निवडणुकीत लोकं थांबले पाहिजे, परिणामी ईव्हीएम मान्य केला तर खचलेल्या मनस्थिती निवडणुका लढाव्या लागतील. म्हणून कार्यकर्त्यांची मानसिक अवस्था हरलेली राहू नये म्हणून शरद पवार आणि उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसाठी बुस्टअप करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. असा टोला लगावत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
आमच्या पक्षात कुठेही वाद नाही. आमचे केंद्रीय नेतृत्व सक्षम आहे. वेगळं मत मांडण्याचा अधिकार कोणाला नाही. निरीक्षक आल्यावर गटनेते निवडले जातील. वावड्या उठवण्यात काय आहे, उद्या, परवा तीन दिवसानंतर येतील, पण येतील. संजय राऊत वेगळ्या मानसिकतेत आहे. ते चांगल्या मानसिकतेत जेव्हा येईल तेव्हा त्यांचे ऐकू. 2029 मध्ये मविआनं एकाकडे तरी विरोधी पक्षनेतेपद राहावं याची काळजी घ्यावी,असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआला लगावला आहे.
नाना पटोले आपला चेहरा पण मतदारसंघात दाखवू शकत नाही-चंद्रशेखर बावनकुळे
विधानसभेत किती वाजेपर्यंत मतदान सुरु होतं? लोकसभेत देखील रात्री 11 पर्यंत मतदान सुरु होतं. दुसऱ्या दिवशी मतदान संख्या डिक्लेअर केली होती. जनमत स्विकारणे म्हणजे हरल्याचे मान्य करणे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षाला आपली माणसं टिकवण्याची भीती आहे. आमच्या काही माणसांना फुगा दाखवला, त्यांना आता परत यायचं आहे. आमचे लोकं मविआकडे अस्वस्थ आहेत. तसेच शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. तर दुसरीकडे नाना पटोले यांना आपला चेहरा पण मतदारसंघात दाखवू शकत नाही. अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली.
पराभव आम्ही लोकसभेत मान्य केला, आम्ही त्यातून शिकलो, पुढे गेलो आणि जिंकलो. तसं यांनी देखील मान्य करायला पाहिजे. आमचे किती खासदार पराभूत झालेत, आम्ही मान्य केला पराभव. त्यानंतर मेहनत केली आणि जिंकलो. बहुमतात सत्ता असली तरी कोणाकडे किती मंत्री, कोणते विभाग जाणार, पोर्टफोलिओ काय असणार हे पुढे कळेल. आमच्यात समन्वय असणार आहे, मविआसारखं सरकार आम्हाला चालवायचं नाही. आम्हाला कोणालाही दुखवायचे नाही, ही आमची क्रेडिबिलिटी आहे. दोन दिवस गेले तरी चालेल यासंदर्भात योग्य निर्णय करु, असे संकेतही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.
लोकसभेत पवार साहेबांनी जनतेला कन्फ्यूज केलं म्हणून मतं भेटली
महायुतीत तिघेही सख्खे भाऊ बसून आम्ही चांगले काम करु. शिंदे प्रगल्भ नेते आहेत, बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेनं प्रभावित आहेत. त्यांच्या वावड्या उठवणं योग्य नाही. लोकसभेत पवार साहेबांनी जनतेला कन्फ्यूज केलं म्हणून मतं भेटली. गुन्हे दाखल होणे आणि गुन्ह्याची सिद्धता होणं हा वेगवेगळा प्रकार आहे. केदार यांना निवडणुका लढता येत नाही हे उदाहरण आहे. कोर्टात सिद्ध झालं तर लढता येत नाही हे आपल्यासमोर आहे, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा