एक्स्प्लोर

Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर महापालिकेत नवा ट्विस्ट, भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी ऑफर, काँग्रेसची डोकेदुखी वाढली

Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपने थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठी ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर महानगरपालिकेतील (Chandrapur Election 2026) सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा नवा ट्विस्ट समोर आला आहे. स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अडकलेल्या सत्तास्थापनेच्या गणितात भाजपने (BJP) थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shiv Sena UBT) सत्तास्थापनेसाठी मोठी ऑफर दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. या घडामोडींमुळे सर्वाधिक जागा मिळवूनही काँग्रेसची डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र आहे.

Chandrapur Mayor Election 2026: भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर

भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पद सव्वा–सव्वा वर्षांसाठी वाटून घेण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासोबतच, पाच वर्षांच्या कालावधीत दोन वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद आणि उपमहापौर पदाचीही ऑफर भाजपने दिल्याचे समजते.

मात्र, या चर्चेत एक महत्त्वाचा अडसर निर्माण झाला आहे. भाजपचा ठाम आग्रह आहे की, पहिले सव्वा वर्षांचे महापौरपद हे भाजपकडेच असावे. जर हा फॉर्म्युला शिवसेना (उबाठा) मान्य करणार नसेल, तर भाजप सत्तेत सहभागी न होता विरोधी बाकांवर बसण्यास तयार आहे, अशी माहिती भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Chandrapur Mayor Election 2026: काँग्रेसची डोकेदुखी वाढली

या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी काँग्रेस अडचणीत सापडल्याचे स्पष्ट दिसत आहे. सर्वाधिक जागा असूनही काँग्रेस सत्तास्थापनेत पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. काँग्रेसमधील नेते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत मतभेद उघड झाल्याचा फायदा भाजप उचलत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसनेही ठाकरेंच्या शिवसेनेला अडीच वर्षांच्या महापौरपदाची ऑफर दिली आहे. मात्र, भाजपने दिलेल्या सत्तेच्या वाटपाचा स्पष्ट आणि आक्रमक प्रस्ताव काँग्रेस गोटात अस्वस्थता निर्माण करणारा असल्याची चर्चा रंगली आहे.  

Chandrapur Mayor Election 2026: शिवसेना उबाठा ‘किंगमेकर’ भूमिकेत

या सत्तासंघर्षात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. दोन्ही बाजूंनी ऑफर मिळत असल्याने शिवसेना उबाठा ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आली आहे. भाजपसोबत हातमिळवणी केल्यास चंद्रपूरमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात, तर काँग्रेससोबत गेल्यास सत्तेचे गणित वेगळे वळण घेईल. आता ठाकरेंची शिवसेना कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ घालणार? चंद्रपुरात भाजप–शिवसेनेचे जुने राजकीय समीकरण पुन्हा जुळणार, की काँग्रेस आपली सत्ता वाचवणार? याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. 

चंद्रपुरातील पक्षीय बलाबल (Chandrapur Election 2026 Result)

एकूण नगरसेवक 66 

काँग्रेस – 27

काँग्रेस समर्थित जनविकास सेना – 3

भाजप – 23

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 6

वंचित - 2

बसपा - 1

शिवसेना (शिंदे गट) – 1

अपक्ष – 2

एमआयएम – 1

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Chandrapur Mayor : चंद्रपूर पालिकेसाठी काँग्रेसच्या सत्तेचा फॉर्म्युला ठरला, अडीच वर्ष धानोरकर गटाचा महापौर, स्थायी समिती अध्यक्षपदी कोणाची वर्णी; वडेट्टीवार म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Embed widget