Chandrapur Mayor : चंद्रपूर पालिकेसाठी काँग्रेसच्या सत्तेचा फॉर्म्युला ठरला, अडीच वर्ष धानोरकर गटाचा महापौर, स्थायी समिती अध्यक्षपदी कोणाची वर्णी; वडेट्टीवार म्हणाले...
Vijay Wadettiwar : पहिले अडीच वर्षे चंद्रपूर मनपात धानोरकर (Pratibha Dhanorkar) गट आणि उरलेले अडीच वर्षे माझ्या गटाचा महापौर असेल, अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

Chandrapur Mayor Update : महापौर पदाची मर्यादा अडीच वर्षाची असते आणि अडीच वर्षांनी पुन्हा आरक्षण इथे लागू होऊन महापौर निवडला जातो. त्यानंतर तो बदलणारच आहे. त्यामुळे पहिले अडीच वर्षे चंद्रपूर मनपात (Chandrapur Municipal Corporation) धानोरकर (Pratibha Dhanorkar) गट आणि उरलेले अडीच वर्षे माझ्या गटाचा महापौर असेल, अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे.
भाजपच्या (BJP) ज्येष्ठ नेत्यांचं वक्तव्य आणि उद्रेक हे आपल्याला पाहायलं मिळाले आहे. आम्ही ठरवलं कि आम्ही एकच फॉर्म भरायचाय. प्रतिभा धानोरकर यांना महापौर निवडण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे तीन महिलांचे अर्ज काढून घेण्याचे काम प्रतिभा धानोरकर यांचा आहे. पुढच्या अडीच वर्षाचा नाव आम्ही सुचवूं असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
Chandrapur Mayor: महापौर आणि उपमहापौर काँग्रेसचा करण्यासाठी आमचा प्रयत्न
चंद्रपूर महानगर पालिकेत एकच अर्ज राहील. महापौर पदाचा एक अर्ज मागे घेतला जाईल. महापौर आणि उपमहापौर काँग्रेसचा करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही करू. स्टँडिंग कमिटी मित्र पक्षाला द्यायची झाली तर ती दिली जाईल. स्टँडिंग कमिटीचा चेअरमन पद आहे ते सहकार्य करणाऱ्या पक्षाला देण्याचं ठरलं आहे.असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
Vijay Wadettiwar : चार महिलांमधील कोण महापौर, ते खासदार प्रतिभा धानोरकर ठरवतील
चार महिलांमधील कोण महापौर पदाचा उमेदवार असेल, ते खासदार प्रतिभा धानोरकर ठरवतील. उपमहापौर पदासाठी वसंता देशमुख या ठरलेल्या आहेत. लिखित करार झाला याची माहिती कुठे मिळाली ते आम्हाला माहीत नाही. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे ग्रामीण भागातील सर्व शेतकऱ्यांना विनंती करतोय कि, भ्रष्ट सरकारला, कामगार विरोधी सरकारला मत देऊ नका, हे तुमचं आयुष्य उध्वस्त करायला निघालाय. केंद्रातील सरकार असो, कि राज्यातलं, यावर्षी सोयाबीनचे रेट पडलेत. पुढच्या वर्षी याचा अजून परिणाम होईल.
Vijay Wadettiwar on Farmer: 'या' करारामुळे शेतकरी मेल्याशिवाय राहणार नाही
यापूर्वी 20 ते 28 टक्क्याच्या वर आयात दर होत्या. निर्णय कशासाठी घेतला हे भारताला माहित आहे. कोणाच्या दबावामुळे हा निर्णय झाला, कुठल्या कारणाने झाला. या करारामुळे शेतकरी मेल्याशिवाय राहणार नाही. त्याला संपून टाकण्याचं काम, आत्महत्येला प्रवृत्त करण्याचे काम केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे होणार आहे. असेही असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
Vijay Wadettiwar : सर्वाधिक आत्महत्या करणारा जिल्हा यवतमाळ, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचे भाजपचं काम
यवतमाळ जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्या आहेत. सर्वाधिक आत्महत्या करणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख होत आहे. दोन लाख 90 हजार कोटीचं कर्ज शेतकऱ्यांवर आहे. निवडणुकीपूर्वी कर्ज माफ करतो, अशा घोषणा केल्या. दीड वर्ष लोकं कुठलीही घोषणा न करता शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम केलं. केंद्र सरकारने 2 लाख 91 हजार कोटींचा प्रस्ताव पाठवला गेला. राज्याची ऐपत नाही आणि केंद्राची देण्याची दानत नाही. केंद्र सरकारने अमेरिकेशी केलेला करार अत्यंत धोकादायक आहे. याचे परिणाम आज नाही तर उद्या दिसणार.भारत भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर 18% स्टॅम्प ड्युटी लावली. मात्र अमेरिकेतून आयात करताना 0% ड्युटी लावली. जी एकेकाळी दहा टक्के होती. अमेरिकेचे झालेल्या करारामुळे शेतकऱ्यांच्या मालाला कोणी विचारणार नाही, अशी परिस्थिती लवकरच निर्माण होईल. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
अमेरिकेत मोठे प्रमाणात मक्याचा उत्पादन होतं. अमेरिकन गहू तांदूळ सोयाबीन हे कमी दरात येत असेल या देशातील शेतकऱ्याचा काय होईल? महाराष्ट्रातील शेतकरी कसा जगेल यावर कोणी गंभीरपणे बोलत नाही. येणाऱ्या काळात याचे दुष्परिणाम हे सरकारला दिसेल. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
चंद्रपुरातील पक्षीय बलाबल (Chandrapur Election 2026 Result)
एकूण नगरसेवक 66
काँग्रेस – 27
काँग्रेस समर्थित जनविकास सेना – 3
भाजप – 23
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 6
वंचित - 2
बसपा - 1
शिवसेना (शिंदे गट) – 1
अपक्ष – 2
एमआयएम – 1
इतर महत्वाच्या बातम्या

























