एक्स्प्लोर

Babanrao lonikar on Maratha Community: या गावात मराठा समाजाची मतं कांड्यावर मोजण्याइतकी... आष्टीतील VIDEO व्हायरल होताच बबनराव लोणीकर सावध, म्हणाले....

Babanrao lonikar video: बबनराव लोणीकर यांना भाजपने परतुर मतदारसंघातून सलग आठव्यांदा उमेदवारी दिली आहे. आष्टीतील त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

जालना: लोकसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे चर्चेत राहिलेल्या मराठवाड्यात विधानसभा निवडणुकीत काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मराठा समाजाची एकगठ्ठा मतं मविआच्या उमेदवारांना मिळाल्याने महायुतीला झटका बसला होता. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस शिल्लक असताना भाजप नेते बबनराव लोणीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आष्टीतील प्रचारसभेतील आहे. या व्हिडीओत बबनराव लोणीकर आष्टीतील अठरापगड जातीचा समाज कशाप्रकारे आपल्या पाठीशी आहेत, हे सांगत होते. मात्र, या नादात त्यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. या गावात मराठा समाजाची कांड्यावर मोजण्याइतकी मतं आहेत, असे बबनराव लोणीकर व्हिडीओ म्हणताना दिसत आहेत.

या गावात अठरापगड जातीचे लोक आहेत. मराठा समाजाची गावात कांड्यावर मोजण्याइतकी मतं आहेत. मात्र, हे गाव सर्व समाजाचे आहे. गावातील सगळ्या जातीधर्माचे लोक माझ्यासोबत आहेत. मराठा, धनगर, माळी, फुलारी, आगलावे, शेट्ट्ये, कांदारे, कांबळे असा सगळा समाज माझ्यासोबत आहे. मी 40 वर्षे राजकारणात असून सगळेजण माझ्यावर प्रेम करतात, असे बबनराव लोणीकर यांनी व्हिडीओत म्हटले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बोटाच्या कांड्यावर मोजण्याइतका मराठा समाजच तुम्हाला निवडणुकीत पाडेल, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर  पाहायला मिळत आहे.

बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण

या सगळ्या वादानंतर बबनराव लोणीकर यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांनी म्हटले की, आष्टी गावात माझी अभुतपूर्व रॅली झाली. या रॅलीला खेड्यापाड्यातील कार्यकर्ते आणि लोक मिळून तब्बल 3 हजार जण होते. यावेळी आज आष्टी गावात अभुतूपर्व रॅली झाली, खेड्यापाड्यातील 3000 लोक सहभागी झाले होते. सगळे कार्यकर्ते होते. आष्टीचं कौतुक करत असताना मी म्हणालो की, मराठा समाजाची मतं या गावात कमी आहेत. हे गाव एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, मुस्लीम अशा अठरापगड जातीचं आहे. मी ४० वर्षे राजकारणात काम करताना या गावाने मला आणि भाजपला लीड दिली.मराठा समाजाची 60 ते 70 टक्के मला भाजपला मिळतात. पण काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करुन व्हीडिओ व्हायरल केला तो खोटा आहे.मला अठरापगड जातीचे लोक मला २५ हजारंच्या मताधिक्याने निवडून देतात. कारण मी काम करतो, लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होतो.  पण काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी चुकीचा व्हीडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मराठा समाज 40 वर्षे माझ्या पाठीशी होता, आताही आहे, मला मला लीड मिळणार आहे, असे बबनराव लोणीकर यांनी म्हटले.

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीसांनी घेतली विनोद पाटलांची भेट, मराठा आरक्षणावरून तापलेल्या मराठवाड्यातील भाजपचं चित्र बदलणार? 

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget