एक्स्प्लोर

छत्तीसगडमध्ये मतदानाआधी नक्षलवादी हल्ला, एक जवान शहीद

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस दोन जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला केला, त्यामध्ये एक जवान शहीद झाला आहे.

रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी नक्षलवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली. नक्षलग्रस्त बिजापूर येथे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. निवडणुकीच्या एक दिवसआधी झालेल्या या घटनेमुळे छत्तीसगडमध्ये दहशतीचे वातावरण आहे. चकमकीनंतर सुरक्षा रक्षकांनी केलेल्या शोध मोहिमेत एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला. ठार केलेल्या नक्षलवाद्याकडे एक बंदूक आणि इतर शस्त्रास्त्रे सापडली आहेत. दुसरीकडे नक्षलवाद्यांकडून कांकेरच्या कोयली बेडा भागात सहा आयईडी स्फोट करण्यात आले. या दरम्यान चकमकीत बीएसएफचा एक जवान गंभीर जखमी झाला. महिंदर सिंह असे या जवानाचे नाव असून त्याला त्वरीत उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उद्या (12 नोव्हेंबर) मतदान प्रक्रिया सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी सुरक्षा दलावर मोठा दबाव आहे. निवडणूक योग्य पद्धतीने पार पडावी यासाठी सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीही छत्तीसगडच्या दंतेवाडा परिसरात नक्षलवाद्यांनी केंद्रीय औद्योगिक दलाच्या (सीआयएसएफ) जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला लक्ष्य केले होते. या हल्ल्यातदेखील सुरक्षा दलातील एक जवान शहीद झाला होता, तर तीन नागरिकांचाही मृत्यू झाला होता. गेल्या 10 दिवसांत सुरक्षा दलावर नक्षलवाद्यांकडून तिसऱ्यांदा हल्ला करण्यात आला आहे. यापूर्वी देखील 30 ऑक्टोबर रोजी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्यात आला होता. छत्तीसगडच्या विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान होणार आहे. यात पहिल्या टप्यात 12 नोव्हेंबरला 18 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तर 20 नोव्हेंबरला बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागांव आणि राजनंदगांव या नक्षलग्रस्त क्षेत्रांमध्ये निवडणूक लढवली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवारी विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवारी विजयी?
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Vidhan Parishad Election : पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Embed widget