Ashok Chavan on Karnataka Elections: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Elections) भारतीय जनता पक्षाचा (BJP) दारुण पराभव झाल्याचं दिसून येत आहे. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाल्याचं चित्र आता दिसू लागलं आहे. संपूर्ण देशातील आणि राज्यातील भाजप नेत्यांनीही हा पराभव मान्य केला असून विरोधी पक्षाच बसण्याची तयारी दर्शवली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.


डबल इंजिन सरकार रुळावरून घसरलं


कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे आणि यासाठी कर्नाटकातील (Karnataka) जनतेचे आभार अशोक चव्हाणांनी मानले आहेत. कर्नाटकातील जनतेने डबल इंजिन सरकारला (Double Engine Government) प्रतिसाद दिला नाही, डबल इंजिन रुळावरून घसरलं, असं अशोक चव्हाण म्हणाले. कर्नाटकात स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केलेल्या कामाला यश मिळाल्याचं ते म्हणाले. लोकांच्या प्रश्नांसदर्भात कुठला पक्ष काय बोलतो, कुठला पक्ष काय करतो हे मतदारांना म्हत्त्वाचं वाटतं आणि यात त्यांना स्वारस्य असतं, असे अशोक चव्हाण म्हणाले.


काँग्रेसच्या आगामी योजनांमुळे मतांचा टक्का वाढला


स्वयंपाकाच्या सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे नागरिकांतील रोष आपण पाहिला. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा जाहीरनामा लोकांना आकर्षक वाटल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. काँग्रेसच्या आगामी योजनेत महिलांसाठी पाच महत्त्वाचे मुद्दे आहेत. महिलांना राज्य परिवहन विभागाच्या बसमधून, म्हणजेच एसटीमधून विनामुल्य प्रवास करता येईल. महिलांना दर महिन्याला काही पैसे दिले जातील (आर्थिक परिस्थिती पाहून), तर बेरोजगार युवकांना मासिक भत्ता दिला जाईल, काँग्रेसच्या या अशा घोषणांमुळे मतदानाची टक्केवारी वाढली असल्याचं दिसतं आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले.


काँग्रेसला सर्व स्तरातून पाठिंबा


कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मतांचा टक्का सर्वाधिक वाढला, भाजपपेक्षा जवळपास दुप्पट जागा आमच्या पक्षास मिळाल्या, असं अशोक चव्हाण म्हणाले. काँग्रेसला सर्व स्तरावर पाठिंबा मिळाल्याचं दिसून येतं, असेही ते म्हणाले.


धार्मिक मुद्द्यांचं सार्वजनिक भांडवल चुकीचं


भाजपने धार्मिक मुद्दे काढले, पण तरीही जनतेनं धार्मिक मुद्दा फार स्विकारल्याचं दिसत नाही, असंही अशोक चव्हाण म्हणाले. आम्ही हनुमान चालिसा घरात म्हणतो, पण त्याचं सार्वाजानिक भांडवल करणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले.


महाविकास आघाडीचा योग्य समन्वय झाल्यास महाराष्ट्रातही बाजी


महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला पोषक वातावरण आहे. महाविकास आघाडीने योग्य समन्वय साधला तर राज्यातही फायदा होईल, असं मत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.


हेही वाचा:


Belgaum Result: बेळगावात काँग्रेसची मुसंडी, 11 जागांवर विजय, भाजपला सात जागा; जाणून घ्या कोण झालं आमदार