Sanjay Raut मुंबई : एका गृहमंत्री पदामुळे महाराष्ट्राचे सरकार आधांतरी लटकून पडलं आहे. हे कसलं मजबूत सरकार? तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे, तुमच्या सोबत अजित पवार आहेत. शिंदे गटाचे लोक तुमच्या सोबत आहेत की नाही हे माहित नाही. भविष्यात ते काय करतील त्यांचा नेम नाही. राजभवनात तुम्ही सत्ता स्थापनेचा दावा करायला तयार नाही आहात. राज्यपालांकडून अजून तुम्ही सत्ता स्थापनेचा निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही आधीच मांडव घातला? राजभवन तुम्ही चालवत आहात का? असे असताना हे एका गृहमंत्री पदावरून थांबलेलं नाही. हे ज्या मागण्या करतायेत त्यावर भाजपने ठरवलं तर एका मिनिटात त्यांना चिरडून टाकतील. असा टोला लगावत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका केली आहे.
तर पुढे जाऊन ते भाजपच्या अंगावर जातील- संजय राऊत
फक्त गृहमंत्री पद सरकार स्थापनेमधला विषय असू शकत नाही. फडणीसांच्या जागी वेगळे कोणी आणलं जातंय का? त्यासाठी सरकार स्थापना थांबली आहे का? उद्यापर्यंत या सगळ्याचा उलगडा व्हायला पाहिजे, नाहीतर आम्ही आमचं पुस्तक उघडू. असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. शिंदेंना गृहमंत्री पद यासाठी हवा आहे कारण त्यांना पोलिसांचे सलाम हवे आहेत. या पदाचा वापर करून त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले, दहशत निर्माण केली. याच यंत्रणेचा वापर करून पुढे जाऊन ते भाजपच्या अंगावर जाऊ शकतात त्यांची वृत्ती आणि विकृती सुद्धा तीच आहे.
ईडी आणि सीबीआयची फुंकर मारली अन् बेईमानांचा पालापाचोळा उडून गेला
रावसाहेब दानवेसह कोण कुठल्या विषयावर उड्या मारतील ते सांगता येत नाही. आम्ही तुमच्या सोबत होतो तेव्हा तुम्हाला आम्ही नकोसे झालो. तेव्हा तुम्ही अमित शहा यांना सांगितले की अडीच वर्ष मुख्यमंत्री पद द्या. शब्द दिला तो पाळा. तुम्हाला बाळासाहेब ठाकरे नको होते. खरे ठाकरे नको होते. तुम्हाला खरी शिवसेना नको होती. यांना मूळ शिवसेना नष्ट करून डुप्लिकेट शिवसेना उभी करायची होती. गुलाबराव पाटील यांना सांगा तुमचा पक्ष शिल्लक राहतो का? ईडी आणि सीबीआयची फुंकर मारली गेली आणि बेईमानांचा पालापाचोळा तो उडून गेला. असे म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे.
ऑन मोहन भागवत
150 कोटी लोकसंख्या असताना सुद्धा लोकसंख्या वाढवा?
मोहन भागवत यांना देशाच्या लोकसंख्येबद्दल खूप चिंता होत आहे. 150 करोड लोकसंख्या झाली आहे अजून किती लोकसंख्या मोहन भागवत वाढवणार आहेत. तुमचं सरकार कॉमन सिविल कोड आणायचा ठरवत आहे. कुटुंब कल्याण कुटुंब नियोजनची योजना चालवत आहे आणि भाजपची पेरेंट बॉडी आरएसएस सांगते मुलं वाढवा. 150 कोटी लोकसंख्या असताना सुद्धा लोकसंख्या वाढवा? आपल्याकडे रोजगार आहे का? आपली सरकार नोकरी देत आहे का? शिक्षण फ्री आहे का? महिलांची सुरक्षा होत आहे का? यावर सरसंघचालक का बोलत नाहीत ? असा सवाल करत संजय राऊत यांनी मोहन भागवत यांनाही लक्ष्य केलं आहे.
हे ही वाचा