Asaduddin Owaisi : लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको. आता पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही. त्यामुळे दोन पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्य असावेत, असे विधान करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. नागपुरात कठाळे कुल संमेलनात बोलताना सरसंघचालकांनी हे विधान केले आहे. दरम्यान याच मुद्यावरून एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी डॉ. मोहन भागवत यांच्यावर टीका करत प्रतीप्रश्न केला आहे.


डॉ. मोहन भागवत यांच्या जिभेवर मला भरोसा नाही- असदुद्दीन ओवेसी


डॉ. मोहन भागवत यांच्या जिभेवर मला भरोसा नाही. ते एकीकडे सांगतात दुसरं आणि करतात भलतंच. मोहन भागवत म्हणतात पोर पैदा करा, मात्र ते काय देतील त्यांना? ते काही स्कीम आणणार आहेत का? TFR रेट हिंदू आणि मुसलमान यांच्यातील खूप वेगळा आहे. त्यामुळे त्यांनी एक स्कीम आणावी माझे 6 मुल आहेत, मोदी आणि अमित शहाचे देखील जास्त मुल आहेत का? असा टोलाही त्यांनी लगावला आहे. मोहन भागवत यांनी  हे नरेंद्र मोदी यांना जाऊन सांगावं. TFR रेट ह्या देशात पडलेला आहे. तर यांचेच काही आमदार म्हणतात 2 च्या वरती मुल नकोत, एकीकडे असं ही बोललं जात आहे, काही तरी एक पकडुन चला असेही असदुद्दीन ओवेसी म्हणाले.


या सर्व गोष्टी मुळे देश मजबूत नाही- असदुद्दीन ओवेसी


एक व्हिडिओ आपण पहिला असेल भाजपची एक महिला पैसे वाटतं आहे आणि उलट कारवाई जलील यांच्यावर झाली, अट्रोसिटी दाखल झाली. VVPAT ची 100 टक्के मोत मोजणी झाली पाहिजे. तसेच ईलेक्शन  फ्री आणि फेअर झाले पाहिजे. पैश्यांची उधळपट्टी करुन निवणुक होता कामा नये. यात निवडणूक अधिकारी  काय करत आहेत? त्यांना हे दिसत नाही का?  असा प्रश्नही असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी केला. दरम्यान, आम्ही तर धन्यवाद करतो मराठा भावांचे, आम्ही नेहमी याबाबत लढत राहू, हे त्यांना सांगितलं आहे. असेही ते म्हणाले. तर अजमेर शरीफ हे सर्व धर्म समभाव असलेलं स्थळ आहे. या सर्व गोष्टी मुळे देश मजबूत नाही, अशी खंत ही असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. 


नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?


 लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको. आता पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही. त्यामुळे दोन पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्य असावेत,  असे अत्यंत महत्त्वाचे विधान करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. नागपुरात कठाळे कुल संमेलनात बोलताना सरसंघचालकांनी हे विधान केले आहे.


या संमेलनात मोहन भागवत यांच्या आधी वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींनी सध्या अनेक तरुण दांपत्य एकही अपत्य जन्माला घालण्यास तयार नाही, असा उल्लेख करत चिंता व्यक्त केली होती. त्याच मुद्द्याला पुढे घेऊन जात सरसंघचालकांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले. नक्कीच सध्या लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचे दर 2.1 पेक्षा खाली गेले, तर तो समाज नष्ट होतो, तो समाज जगाच्या पाठीवर नसतो, त्याला कोणी नष्ट करत नाही, तर तो स्वतःहून नष्ट होतो. अनेक भाषा आणि समाज असेच नष्ट झाले आहे, असे मोहन भागवत म्हणाले. 


आपल्या देशाची लोकसंख्या नीती वर्ष 2000 च्या जवळपास ठरली. त्याच्यातही असेच सांगितले आहे की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली राहू नये, असा उल्लेख करत भागवत म्हणाले की आता पॉईंट एक तर माणूस जमत नाही. मग जर 2.1 एवढे लोकसंख्या वाढीचे दर पाहिजे, तर अपत्य दोन पेक्षा जास्त पाहिजे. मग तीन पाहिजे कमीत कमी असंही भागवत म्हणाले.