Mahayuti Delhi Meeting Inside Stroy मुंबई: मुख्यमंत्री दरे गावातून परतल्यावर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येणार का असा सवाल आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस झाले. मात्र अजूनही सरकारचा पत्ता नाही. 5 डिसेंबरला शपथविधी होणार आहे. परंतु अजूनही मुख्यमंत्रि‍पदी कोण असणार याबाबत अधिकृत नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. याचदरम्यान दिल्लीत पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी (Mahayuti Delhi Meeting Inside Story) एबीपी माझाच्या हाती आली आहे. 

Continues below advertisement

अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत बैठक झाली होती. यावेळी अमित शाह यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांच रिपोर्ट कार्ड मागवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संबंधित आमदाराचा लोकसभा निवडणुकीवेळी परफॉर्मन्स कसा होता, संबंधित व्यक्तीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच इमानेइतबारे काम केलं होतं का?, याचा विचार देखील मंत्रिपद देताना विचारत घेतलं जाणार आहे, अशी सूत्रांची माहिती समोर आली आहे.

रिपोर्टकार्ड घेऊन दिल्लीत या-

मंत्रिमंडळात इच्छुक माजी मंत्री असेल, तर संबंधित मंत्र्याने महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कामकाज कशा प्रकारे केलं?, संबंधित व्यक्ती मंत्रालयात किती वेळ कामकाजासाठी देत होता?, महायुती म्हणून आपल्या घटकपक्षातील आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती?, याबाबत अमित शाह यांनी रिपोर्टकार्ड मागवलं आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे मंत्र्याने केला?, संबंधित मंत्र्यामुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थितीत निर्माण झाली होती का? वादग्रस्त वक्तव्य केली का?, या मुद्यांचं रिपोर्टकार्ड घेऊन महायुतीच्या नेत्यांना अमित शाह यांनी दिल्लीत बोलावलं आहे. आज महायुतीचे नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

संपूर्ण राज्याला उत्सुकता-

उपमुख्यमंत्री किती असणार कोण कोण असणार याचाही फैसला अजून झालेला नाही. महायुतीची बैठक होणं अपेक्षित असताना ती लांबलेली आहे. सत्तास्थापनेआधी महायुतीची बैठक कधी होणार याची उत्सुकता आहे. त्याचसोबत महायुतीत शिवसेना, राष्ट्रवादीने आपापले गटनेते जाहीर केलेत. मात्र अजूनही भाजपची विधिमंडळ पक्षनेतेपदाची घोषणा रखडलीय. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार याची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिली आहे.

संबंधित बातमी:

Eknath Shinde: हातात कागदपत्रे, चेहऱ्यावर निराशा...; दरेगावातून निघताच आजीबाई समोर आल्या, एकनाथ शिंदेंनी लगेच गाडी थांबवली अन्...