GOA Election Results 2022 LIVE: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येत आहेत. यामध्ये पंजाब (Punjab Election Results), गोवा (Goa Election Results), उत्तरप्रदेश (Uttar Pradesh Election Results), उत्तराखंड (Uttarakhand Election Results) आणि मणिपूर (Manipur Election Results) या पाच राज्यांचा समावेश आहे. या निवडणुकांमध्ये खासकरुन गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आपला झेंडा रोवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.  गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.   निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मत वाटा मिळालाय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास 1.06% मतं मिळाली आहेत.  विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे 'नोटा'ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहे. 1.17% मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला आहे.


 शेजाऱ्यांच्या घरात पाळणा हलला की, पेढे वाटपाचे कार्यक्रम- आशिष शेलार 


या निकालानंतर भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टोमणे मारले जात आहेत. भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, इसवी सन 2024 साली दिल्लीच्या खुर्चीत बसणार आहे. उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करुन दाखवतो. उत्तर प्रदेशात युवराजांची अती विराट सभा...झंझावाती दौरा... सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले...अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल हारले..“एक मासो आणि खंडी भर रस्सो!” अरविंद केजरीवालांचा आता बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार होईल.. शिवाजी पार्कमध्ये हत्तीवरून युवराज साखर सुध्दा वाटतील, असं ते म्हणाले.  शेजाऱ्यांच्या घरात पाळणा हलला की, पेढे वाटपाचे कार्यक्रम करुन दाखवले जातात..  “आपले नाही धड अन शेजाऱ्याचा कढ!” असं शेलारांनी म्हटलं आहे. 






 


मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा 500 मतांनी विजय





गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय झाला आहे. साखळी मतदारसंघात प्रमोद सावंत 500 मतांनी विजयी झाले. सुरुवातीच्या कलांमध्ये प्रमोद सावंत पिछाडीवर होते, परंतु त्यांनी जोरदार मुसंडी मारुन विजय मिळवला. आतापर्यंतच्या कलामध्ये भाजपला 19 तर काँग्रेसला 12 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपनं सत्तास्थापनेचा दावा केला असून आजच शपथविधी होणार असल्याचं बोललं जात आहे. 





या ठिकाणी पाहा लाईव्ह निकालाचे अपडेट्स 


https://marathi.abplive.com/live-tv/amp 


https://twitter.com/abpmajhatv 


https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 


संबंधित बातम्या


Share Market : पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी सेन्सेक्स 1000ने वधारला, निफ्टी देखील 321 अंकांनी वर


Goa Election Result : गोव्यात चुरस वाढली! सुरुवातीचे सर्व कल हाती; काँग्रेस-भाजपमध्ये घासून सामना, उत्पल पर्रीकर पिछाडीवर


Election Result 2022 : सुरुवातीच्या कलांमध्ये यूपी, उत्तराखंडमध्ये भाजप, पंजाबमध्ये आप आघाडीवर तर गोव्यात घासून!


Goa Election Results 2022: भाजपचे बंडखोर उत्पल पर्रिकर यांचा पराभव


Goa Election Result : गोव्यात चुरस वाढली! सुरुवातीचे सर्व कल हाती; काँग्रेस-भाजपमध्ये घासून सामना 


Goa Election Result 2022: बंडखोर उत्पल पर्रिकर भाजपचा अभेद्य किल्ला भेदणार?