यशोमती ताई तुम्हाला लोकांनी नाहीतर ईव्हीएम मशीनने पराभूत केलं, काँग्रेस खासदाराचा आरोप, नवनीत राणांनाही लगावला टोला
इथल्या नेत्या म्हणतात की चार चार मुलांना जन्माला घाला, अरे पण ही महानगरपालिका निवडणूक आहे न असा टोला काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगढी यांनी भाजप नेत्या नवनीत राणा यांना लगावला.
Amravati : इथली एक महिला येते काहीही बोलते, एक व्यक्ती हेलिकॉप्टरने येतो आणि काहीही बोलून जातो. मुंबईत बसलेला दीड फुटवाला काहीही बोलतो. एक जॅकेट वाला काहीही बोलतो असे म्हणत काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगढी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ते अमरावतीत बोलत होते. इथल्या नेत्या म्हणतात की चार चार मुलांना जन्माला घाला, अरे पण ही महानगरपालिका निवडणूक आहे न असा टोला प्रतापगढी यांनी भाजप नेत्या नवनीत राणा यांना लगावला. यशोमती ताई तुम्हाला लोकांनी नाहीतर ईव्हीएम मशीनने पराभूत केल्याचा आरोप देखील प्रतापगढी यांनी केला.
MIM ने हिजाब वाली एक आमदार, एक खासदार नाही केलं आणि बोलतात हिजाब वाली पंतप्रधान होणार अशी टीका देखील प्रतापगढी यांनी ओवेसी यांच्यावर केली. यशोमती ताई तुम्हाला लोकांनी पराभव नाही केलं तर तुम्हाला ईव्हीएम मशीनने केल्याचे ते म्हणाले. देशाच्या लोकसभेत रात्री उशिरा राहुल गांधी आणि इतर नेते बसले होते. त्यावेळी अजित पावर गटाचे खासदार मोदींकडे बसले होते असे ते म्हणाले. तुम्ही जर वेगळा झेंडा हातात नाही घेतला तर हा काँग्रेसचा तिरंगा आहे जे देशाला समोर घेऊन जाईल. स्थानिक सरकार आवश्यक आहे. राज्यात कोणतीही सरकार असो पण खरी ताकद या नगरसेवकांना द्या कारण सोबत याठिकाणी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आहेत असे प्रतापगढी म्हणाले.
पैसे घ्या आणि पंजाला मतदान करा
आज निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आठवड्याभरापासून तुम्ही भाषण ऐकत आहात. महानगरपालिका मध्ये मुलं जन्माला घालण्याचं काय प्रश्न असे प्रतापगढी म्हणाले. ही लोकल निवडणूक आहे आणि गोष्टी पंतप्रधानाच्या होतात. यांना पाकिस्तानचा खूप अभ्यास आहे असं वाटतं की लपून छपून जातात वाटते. यांच्या गोष्टी दोन दिवस ऐका आणि सोडा. यांचा इरादा हाच आहे की हिंदू मुस्लिम करायचं आहे. सत्ताधारी येतील आणि तुम्हाला आधी धमकवणार किंवा आमिश दाखवतील नाहीतर पैसे देतील ते पैसे घ्या आणि पंजाला मतदान करा असे आवाहन देखील प्रतापगढी यांनी केलं. महानगरपालिकेच्या प्रचाराचा आजचा शेवटच्या दिवस आहे. परवा म्हणजे 15 जानेवारीला या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या काळात राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यामुळं मतदानापूर्वी राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.





















