अमरावतीत पुन्हा राणा विरुद्ध अडसूळ वाद चिघळला; महायुतीत अभिजित अडसूळ विरोधात रमेश बुंदीलेंची बंडखोरी
Vidhan Sabha Election 2024 : दर्यापूर मतदार संघात आमदार रवी राणा यांनी भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले यांना युवा स्वाभिमान पार्टीची उमेदवारी देत महायुतीत बंडखोरी केल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra Politics अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या ( Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या देशासह राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. सत्ताधारी महायुती (Mhayuti) आणि विरोधी बाकावरील महाविकास आाघाडीतील (Maha Vikas Aghadi) उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तर काही जागांवरील वाद अद्याप कायम असून तो मिटवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षनेतृत्वाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, राज्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वात हायव्होल्टेज लढाई असणार्या काही मतदारसंघात अमरावतीचा (Amravati) समावेश आहे. कारण हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत महायुतीसाठी (Mahayuti) काहीसा डोकेदुखी ठरल्याचे बोलले जात आहे. कारण महायुतीतील घटकपक्ष असेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि दर्यापुरचे माजी आमदार कॅप्टन अभीजीत अडसूळ (Navneet Rana) आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यातील वाद वेळोवेळी उफाळून आला आहे.
दरम्यान, आता हाच वाद विधानसभा निवडणुकीतही बघायला मिळणार असल्याची शक्यता आहे. कारण दर्यापूर मतदार संघात आमदार रवी राणा यांनी भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले यांना युवा स्वाभिमान पार्टीची उमेदवारी देत महायुतीत बंडखोरी केल्याचे बोलले जात आहे. महायुतीमध्ये असूनही रवी राणा यांनी महायुतीच्या उमेदवारा विरोधात उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे अमरावतीत पुन्हा राणा विरुद्ध अडसूळ(Captain Abhijeet Adsul) वाद चिघळण्याची शक्यता आहे.
बाहेरचे पार्सल चालणार नाही- रवी राणा
दर्यापूर येथे रमेश बुंदीले युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आहेत. तर याच मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या उमेदवारीला आमदार रवी राणा यांचा विरोध आहे. त्यामुळे रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करत आव्हान दिले आहे. एखाद्या माणूस मुंबईवरून येऊन एखाद्या मतदारसंघावर अतिक्रमण करते, असे म्हणत रवी राना यांनी टीका केली आहे. मुंबईतील कांदीवलीचे पार्सल चालणार नाही, असे म्हणत रवी राणा यांनी अभिजित अडसूळ यांच्यावर टीका केली आहे.
माझ्यावर बट्टा लावण्याचा प्रयत्न रवी राणा करताय- अभिजित अडसूळ
दरम्यान, दर्यापूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या विरोधात महायुतीचे घटक पक्ष असलेले आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचे तथा भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले आज बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली आहे. जर कोणी विरोधात उमेदवार दिला तर आम्ही पण बडनेरा मतदार संघात उमेदवार देणार. असा इशारा अभिजित अडसूळ यांनी रवी राणा यांना दिला आहे. जर दर्यापूरमध्ये रवी राणा यांनी उमेदवार उभा केला तर आमदार रवी राणा हे महायुतीतून बाहेर पडतील. माझ्यावर बट्टा लावण्याचा प्रयत्न रवी राणा करताय. आम्ही बडनेरात रवी राणा विरोधात कोणालाही उमेदवारी देऊ शकतो. असेही ते म्हणाले.
हे ही वाचा