एक्स्प्लोर

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासाठी अमित शाहांचं मिशन 45, शिवसेनेसोबतच्या युतीचा उल्लेखही नाही

भाजपच्या आढावा बैठकीत अमित शाहांनी महाराष्ट्रासाठी भाजपचं 'मिशन 45' मांडलं. 45 पेक्षा कमी जागा मिळाल्या, तर त्याला विजय मानता येणार नाही. या 45 जागांमध्ये बारामतीचाही समावेश असेल, असं अमित शाह म्हणाले.

पुणे : भाजपच्या विजयाचा मेरु, आता कोणीही रोखू शकणार नाही, असा एल्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यात केला. विशेष म्हणजे अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यापैकी कोणीही शिवसेना किंवा युतीचा साधा उल्लेखही भाजपच्या आढावा बैठकीत केला नाही. भाजपच्या बैठकीत अमित शाहांनी महाराष्ट्रासाठी भाजपचं 'मिशन 45' मांडलं. 45 पेक्षा कमी जागा मिळाल्या, तर त्याला विजय मानता येणार नाही. या 45 जागांमध्ये बारामतीचाही समावेश असेल, असं अमित शाह म्हणाले. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलताना बारामतीसह 43 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला होता. महाराष्ट्रात 45 जागा जिंकल्या तर केरळमध्येही भाजपची सत्ता असेल, असा विश्वासही शाहांनी व्यक्त केला. आसाम, त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता येईल, असं कोणालाही स्वप्नातही वाटलं नव्हतं, असंही शाह म्हणाले.
यावेळी 43 जागा जिंकू आणि 43 वी जागा बारामतीची असेल : देवेंद्र फडणवीस
बूथ कार्यकर्ते हेच भाजपच्या विजयाचं रहस्य आहे. भाजप हा नेत्यांचा नाही, तर कार्यकर्त्यांच्या पक्ष असल्याचं सांगत अमित शाहांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवरही टीकास्त्र सोडलं. अमित शाहांनी काँग्रेससह सर्व विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला. 2019 मध्ये'ठगबंधन' जिंकल्यास देश मागे जाईल, मात्र भाजप जिंकल्यास घराणेशाही, जातीवाद यांची सद्दी संपुष्टात येईल, असा विश्वासही शाहांनी व्यक्त केला. फडणवीस सरकारचं कौतुक करताना अमित शाहांनी राज्यातील भ्रष्टाचार संपल्याचा दावा करत सिंचन घोटाळ्यावरुन राष्ट्रवादीला कानपिचक्या दिल्या. यूपीए सरकारने दहा वर्षांत 53 हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. मात्र मोदी सरकार एका वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात 75 हजार रुपये टाकणार. म्हणदे दहा वर्षांत 75 लाख रुपये जमा होतील, असंही शाह म्हणाले. राहुल बाबा (गांधी) यांना साधी आकडेमोडही येत नाही. आग्य्रातील भाषणात त्यांनी बटाट्यांची फॅक्टरी काढण्याचं सांगितलं होतं. मात्र बटाटे जमिनीच्या वर येतात की खाली, हेसुद्धा त्यांना माहित नाही, असं अमित शाह म्हणाले. आम्ही 'वन रॅंक वन पेन्शन' लागू केलं. जवानांच्या खात्यामध्ये आठ हजार कोटी रुपये जमा होतील. 'कॉंग्रेसचं OROP म्हणजे ओन्ली राहुल, ओन्ली प्रियंका' असा घणाघातही शाहांनी केला. मला महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून द्या, मी देशभरातून घुसखोरांना निवडून निवडून काढेन, असं आवाहनही शाहांनी केलं. उत्तर प्रदेशाच्या कानाकोपऱ्याची मला माहिती आहे. गठबंधन होऊ दे, नाहीतर काहीपण, भाजप 72 ची 73 होईल, मात्र 71 जागांवर येणार नाही, असा विश्वासही शाहांनी व्यक्त केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्यTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवादTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
×
Embed widget