एक्स्प्लोर

अक्षय कुमारचे प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उत्तरं!

अक्षयने पंतप्रधानांना अनेक मुद्द्यांवर बोलतं केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. इतकंच नाही तर अक्षयच्या काही प्रश्नांवर मोदी खळखळून हसतानाही पाहायला मिळत आहेत

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार एका नव्या क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं ट्वीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याचं हे नवं क्षेत्र कोणतं, याचं उत्तर मिळालं आहे. बॉलिवूडच्या खिलाडीने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे. अक्षय कुमारने घेतलेली नरेंद्र मोदींची मुलाखत उद्या सकाळी प्रक्षेपित केली जाणार आहे. खुद्द अक्षयने याबाबत ट्विटरवरुन माहिती देत प्रोमो शेअर केले आहेत. ही मुलाखत अराजकीय असल्याचं अक्षयने म्हटलं आहे. अक्षयने पंतप्रधानांना अनेक मुद्द्यांवर बोलतं केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. इतकंच नाही तर अक्षयच्या काही प्रश्नांवर मोदी खळखळून हसतानाही पाहायला मिळत आहेत. मुलाखतकाराच्या भूमिकेतील खिलाडीने राजकारणातील बड्या खिलाडीची घेतलेली मुलाखत तुम्ही 'एबीपी माझा'वर उद्या (बुधवार 24 एप्रिल) सकाळी नऊ वाजता पाहू शकाल. अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केलं होतं. "आज मी जे करणार आहे, ते यापूर्वी कधीही केलेली नाही. मी याबाबत अतिशय उत्साही आणि अधीर आहे. पुढची माहिती लवकरच..." या ट्वीटनंतरच अक्षय कुमार भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. अक्षयने आणखी एक ट्वीट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं. "मी याआधी केलेल्या  ट्वीटमुळे तुम्हा सगळ्यांची उत्सुकता ताणली गेल्याचं पाहून आनंद वाटला, पण मी निवडणूक लढवत नाही, हे इथे स्पष्ट करु इच्छितो" असं अक्षयने म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget