एक्स्प्लोर

Akola : अकोल्यात महापौरपदासाठी शेवटपर्यंत रस्सीखेच सुरूच; भाजपनंतर आता विरोधी पक्षांचाही विजयाचा दावा

Akola Election : आपल्यासोबत 44 नगरसेवक असल्याचा दावा करत भाजपने शहर सुधार आघाडीच्या नावाखाली गटाची नोंदणी केली आहे. तर आपल्यासोबत 41 नगरसेवक असल्याचा वादा काँग्रेस आणि विरोधी गटाने केला आहे. 

अकोला : अकोल्यात महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप वगळता इतर पक्षांच्या बैठकीचे सत्र सुरू आहे. त्यामध्ये काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, AIMIM पक्षाचे सर्व नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष सहभागी झाले आहेत. या बैठकीला अपक्ष नगरसेवकांसह काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदारही उपस्थित आहेत.  शुक्रवारी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीसंदर्भात ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्याने आपले संख्याबळ 44 वर पोहोचल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याचा विश्वास व्यक्त करत शहर सुधार आघाडीच्या नगरसेवकांनी गटाची नोंदणी केली आहे. अकोल्यात बहुमतासाठी 41 नगरसेवकांची गरज आहे. 

दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही सत्ता आमचीच येणार, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. आमच्याकडे संख्याबळ असून 41 हून अधिक नगरसेवक आपल्यासोबत असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे. त्यामुळे अकोल्यात महापौरपदाची बाजी नेमकी कोण मारणार, याचा अंतिम फैसला शुक्रवारच्या मतदानातूनच स्पष्ट होणार आहे. 

अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल (Akola Municipal Corporation Election 2026)

एकूण जागा : 80

बहुमताचा आकडा : 41

भाजप : 38

काँग्रेस : 21

उबाठा : 06

शिंदे सेना : 01

अजित राष्ट्रवादी : 01

शरद राष्ट्रवादी : 03

वंचित : 05

एमआयएम : 03

अपक्ष : 02

Akola Mayor Election : महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव

अकोला महापालिकेतील महापौरपद हे यावेळी ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून नितू जगताप या महापालिकेतील सर्वात तरुण नगरसेविकेचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. नितू जगताप या प्रभाग क्रमांक 3-ब मधून पहिल्यांदाच भाजपकडून निवडून आल्या असून, त्या केवळ 25 वर्षांच्या आहेत. त्या शिक्षण आणि व्यवसायाने इंटेरियर डिझायनर असून, त्यांच्या तरुण वयामुळे आणि ओबीसी महिला प्रवर्गातील स्थानामुळे त्या महापौरपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

ही बातमी वाचा:

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Embed widget