एक्स्प्लोर

Ganesh Sugar Factory Election Result : होमग्राऊंडवर राधाकृष्ण विखे पाटलांना धक्का, थोरात-कोल्हे पॅनलचा विजय

Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा धक्का बसलाय. 19 जागांपैकी 11 जागांवर थोरात कोल्हे युतीने बाजी मारली आहे.

Ganesh Sugar Factory Election Result 2023 : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना संचालक पदाच्या 19 जागांसाठीची मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीच्या कलामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा धक्का बसलाय. 19 जागांपैकी 11 जागांवर थोरात कोल्हे युतीने बाजी मारली आहे.  तर विखे गटाला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे.  विखे पाटलांच्या ताब्यात असलेली सत्ता खेचण्यासाठी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपच्या विवेक कोल्हे गटाची 18 जागांवर आघाडी झाली होती. आज सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली, सुरुवातीचे कल पाहाता गुलाल थोरात आणि कोल्हे गट उधाळणार असे चित्र आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या विजयासह भाजपचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील साखर कारखान्याच्या निवडणुकीत  जोरदार मुसंडी मारली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजधानी दिल्लीमध्ये वजन वाढले होते. त्याशिवाय भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी पुढील उमेदवार म्हणूनही विखेंच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळेच भाजपच्याच लोकांनी विखेंचा पराभव केला, अशी चर्चा अहमदनगरमध्ये सुरु आहे. गणेश सहकारी साखर कारखाना संचालक पदाच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटलांचा पराभव जवळपास निश्चित मानला जातोय. थोरात कोल्हे युतीची मोठ्या आघाडीकडे वाटचाल सुरु आहे. 19 पैकी 11 जागांवर थोरात कोल्हे युतीचा विजय झालाय तर विखे गटाला अवघी 1 चा जागा मिळाली आहे. उर्वरित 7 जागांवर सुद्धा थोरात-कोल्हे आघाडीची वाटचाल विजायकडे सुरु आहे. सातही जागांवर विखे पाटील यांच्या पॅनलचा पराभव होण्याची शक्यता आहे, केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.

भाजपच्या युवा नेत्याने केला भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याचा पराभव

अहमदनगर जिल्ह्यातील गणेशनगर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत 19 जागांसाठी मतमोजणी सुरू असून 11 जागांवर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे व काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या युतीने विजय मिळवलाय तर विरोधात असणाऱ्या भाजपच्या ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना 1 जागेवर समाधान मानण्याची वेळ आलीय.. उर्वरित 7 जागांवर सुद्धा कोल्हे थोरात युती आघाडीवर असून विखे पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय.. दिल्ली दरबारी वजन आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणार अहमदनगर जिल्ह्यातील नाव म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील.. राहाता मतदार संघातील  गणेश नगर सहकारी साखर कारखान्यात मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातातील 8 वर्षांची सत्ता सोडण्याची वेळ आलीय.. भाजपचे युवा नेते व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची साथ घेत हा विजय संपादन केलाय

महत्त्वाच्या बातम्या

Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Eknath Shinde Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: शिंदे गटात जाताच सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना पत्र धाडलं; म्हणाले, साहेब...
शिंदे गटात जाताच सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना पत्र धाडलं; म्हणाले, साहेब...
Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: एकनाथ शिंदेंची एक ऑफर आणि ठाकरेंचा विश्वासू आमदार थेट शिंदे गटात; सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाची Inside Story
एकनाथ शिंदेंची एक ऑफर आणि ठाकरेंचा विश्वासू आमदार थेट शिंदे गटात; सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाची Inside Story

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Delhi Visit: श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
Gold-Silver Price Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
Sunil Shinde Shivsena: ठाकरे गटाचा वरळीतील आणखी एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? सुनील शिंदेंना नीलम गोऱ्हेंची भावनिक साद, म्हणाल्या....
Sunil Shinde Shivsena: आमच्या पक्षात कामाची मोठी संधी, ठाकरे गटाच्या सुनील शिंदेंना शिवसेनेकडून भावनिक साद
Western Railway Monkey: माकड रेल्वे ट्रॅकवर ठाण मांडून बसलं, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Western Railway Monkey: माकड रेल्वे ट्रॅकवर ठाण मांडून बसलं, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Sanjay Raut: राजकीय भविष्यासाठी आम्हा सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज; ठाकरेंची मुलुखमैदानी तोफ खासदार संजय राऊतांचा 'रोखठोक' रोख नेमका कोणाकडे?
राजकीय भविष्यासाठी आम्हा सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज; ठाकरेंची मुलुखमैदानी तोफ खासदार संजय राऊतांचा 'रोखठोक' रोख नेमका कोणाकडे?
Vaibhav Sooryavanshi: 'बेबी बाॅस' वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री होणार की नाही? अजूनही सस्पेन्स कायम, कॅप्टन श्रेयस अय्यरच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या, पाऊस सुद्धा व्हिलन होण्याची चिन्हे
'बेबी बाॅस' वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री होणार की नाही? अजूनही सस्पेन्स कायम, कॅप्टन श्रेयस अय्यरच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या, पाऊस सुद्धा व्हिलन होण्याची चिन्हे
Embed widget