एक्स्प्लोर

Ahmednagar Lok Sabh Election Results Live : फाडफाड इंग्रजी बोलता आलं नाही, पण धाडधाड मतं पडली; अहमदनगरमध्ये निलेश लंके विजयी, सुजय विखेंवर पराभवाची नामुष्की

अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत (Ahmednagar Lok Sabha Election) भाजपचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात लढत झाली.

Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 :  अहमदनगर जिल्हा (Ahmednagar News) जसा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसाच तो सगेसोयऱ्यांच्या राजकारणासाठी देखील ओळखला जातो.  यंदा अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत (Ahmednagar Lok Sabha Election) भाजपचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत  निलेश लंकेनी विजय मिळवला असून  सुजय विखेंचा दणदणीत पराभाव केला आहे. अहमदनगरमधून निलेश लंके 29317 मतांनी विजयी झाले आहे. 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यावेळी मतदानाचा टक्का किचिंत वाढला आह. गेल्यावेळी म्हणजे 2019  ला अहमदनगर मतदारसंघात 64.79 टक्के मतदान झाले होते. यावेळी ते 66.61  टक्के मतदान झाले. मतदानाचा टक्का वाढला तरी   महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. त्यामुळे आता मतदानाच्या वाढत्या आकडेवारीचा  फायदा होणार निलेश लंकेंना फायदा झाला . प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता.  मतदानाचा निकाल (Ahmednagar Lok Sabha Election Result 2024) स्पष्ट झाला असून निलेश लंके यांनी बाजी मारली आहे 

Ahmednagar Lok Sabh Aconstituency Election Results Live

उमेदवाराचे नाव 

  पक्ष   

विजयी  उमेदवार

निलेश लंके  महाविकास आघाडी (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट विजयी
सुजय विखे पाटील       महायुती (भाजप)  

अहमदनगरमध्ये  (Ahmednagar Lok Sabha Election)  एकूण 66.61 टक्के मतदान झाले आहे. गेल्यावेळी म्हणजे 2019  ला अहमदनगर मतदारसंघात 64.79  टक्के मतदान झाले होते.  अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यावेळी मतदानाचा टक्का किचिंत वाढला आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक उत्साह असल्याचे पाहायला मिळाले. सुजय विखे पाटील आणि निलेश लंक यांच्यातील लढत ही अटीतटीची आहे. त्यामुळे  वाढलेला मतदानाचे 1.82 टक्के  देखील निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अहमदनगरमध्ये  येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक मतदान राहुरी आणि पारनेरमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे.  बारामतीप्रमाणे अहमदनगर लोकसभा मतदार (Ahmednagar Lok Sabha Election)  संघात मतदानाच्या आदल्या रात्री  पैशाचा पाऊस पडत असल्याचा आरोप देखील करण्यात आला.  

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान? (Ahmednagar Lok Sabha Voting Percentage 2024)

एकूण मतदान - 66.61 टक्के

  • पारनेर  - 70.13 टक्के
  • राहुरी - 70.00 टक्के
  • श्रीगोंदा- 67.90 टक्के
  • कर्जत - जामखेड - 66.19
  • शेवगाव- 63.03 टक्के
  • अहमदनगर शहर- 62.50 टक्के

Ahmednagar Lok Sabha Election Results Live : कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार? 

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अहमदनगर शहर,श्रीगोंदा, पारनेर ,शेवगाव- पाथर्डी कर्जत- जामखेड, राहुरी (काही भाग) असे विधानसभा मतदारसंघ आहेत. दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे (NCP) 4, भाजपचे 2 आणि विधान परिषदेवर भाजपचे 1 असे आमदार आहेत. एकूणच बघितलं तर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बलाबल जास्त दिसून येते. मात्र राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याने राष्ट्रवादीतील दोन आमदार हे अजित पवार (Ajit Pawar) गटात गेले असून दोन आमदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटात आहेत. 

  • पारनेर  -   निलेश लंके
  • राहुरी -   प्राजक्त तनपुरे
  • श्रीगोंदा- बबनराव पाचपुते
  • कर्जत - जामखेड - रोहित पवार
  • शेवगाव-  मोनिका राजळे
  • अहमदनगर शहर-   संग्राम जगताप

2019 सालचा निवडणूक निकाल - (Ahmednagar Lok Sabha Constituency 2019 Result) 

  • सुजय विखे पाटील - 7,04,660 मते (विजयी)
  • संग्राम जगताप- 4,23,186 मते (पराभूत)
  • मताधिक्य - 2 लाख 81 हजार 526

2019 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे  संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांचा 281474 मतांनी पराभव केला होता.   राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार असले तरी मात्र खासदार भाजपचा होत असल्याचं अनेक वेळेला पाहायला मिळालं.

मतदार नेमकी कुणाची प्रतिष्ठा अबाधित ठेवणार? 

एकूणच यंदाची निवडणूक ही केवळ लंके विरुद्ध विखे अशी न राहता थेट पवार विरुद्ध विखे अशी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक राज्यातील दोन मोठ्या राजकीय घराण्याच्या प्रतिष्ठेची झाली होती.  

नगर लोकसभेत सगेसोयरे फॅक्टर चालणार?

अहमदनगर जिल्ह्यात सगेसोयऱ्यांच्या राजकारणाला मोठे महत्त्व आहे. अहमदनगरच्या राजकारणातील मोठे नेते असलेल्या बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh), मोनिका राजळे (Monika Rajale), चंद्रशेखर घुले (Chandrashekhar Ghule), राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade), शिवाजी कर्डीले (Shivgaji Kardile) आणि  संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांचे एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत. जरी वेगवेगळ्या पक्षात ही सर्व घराणे असले तरी राजकीय निवडणुकांमध्ये ते एकमेकांना मदत करताना अनेक वेळेला पाहायला मिळाले आहे.  मात्र यंदा नगरमध्ये सगे-सोयरे फॅक्टर चालला नाही असेच दिसून येत आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget