एक्स्प्लोर

निवडणुकीचे काम आटोपून परतताना अपघात, दोन अपघातात दोन शिक्षकांसह तिघांचा मृत्यू

तीव्र गतीने जात असलेल्या कारच्या चालकाला झोप आल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकली. कारमधील चारही शिक्षक निवडणुकीच्या ड्युटीवर होते. रात्री उशिरा काम संपवून हे शिक्षक उमरेडच्या दिशेने निघाले होते.

नागपूर : नागपुरातून निवडणुकीचे काम आटपून उमरेडकडे परत जाणाऱ्या शिक्षकांच्या वाहनाला अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन शिक्षक गंभीर जखमी आहेत. नागपूर उमरेड रस्त्यावर चांपा गावाजवळ आज पहाटे 4 वाजता ही घटना घडली. नुकेश मेंधुले (38) आणि पुंडलिक बहे (56) अशी मृत शिक्षकांची नावं आहेत. तर विजय बोहरूपी, रमेश पिपरे अशी जखमी शिक्षकांची नावं आहेत. या सर्व शिक्षकांची निवडणूक मतदान कर्मचारी म्हणून हिंगणा विधानसभा क्षेत्रात नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुकीचे कामकाज आटोपून चारही शिक्षक पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनाने उमरेडला निघाले होते. रमेश पिपरे हे वाहन चालवत असताना वाहनाने एका झाडाला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की वाहनाचा पुढील भागाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. यामध्ये नुकेश मेंढुले हे जागीच ठार झाले तर पुंडलीक बहे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दोन शिक्षक जखमी झाले आहेत.  दोन जखमी शिक्षकांना उपचारासाठी नागपूर मेडिकल येथे रवाना करण्यात आले आहे. नुकेश उमरेड येथील अशोक विद्यालयात कार्यरत होते तर पुंडलिक बहे हे कुही तालुक्यातील साळवा येथील खापर्डे विद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. दुसरीकडे यवतमाळमध्येही निवडणुकीचे काम आटोपून येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात आर्णी तालुक्यातील कोसदनी घाटात अपघात अल्टो आणि बोलेरोच्या अपघातात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
निवडणूक संदर्भातील काम आटोपून हे चार कर्मचारी त्यांच्या कारने पुसद तालुक्यातील कोंदरी या मतदान केंद्रावरून आर्णीकडे येताना कोसदनी घाटात समोरुन येणाऱ्या बोलेरोने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यात कारमधील विकास गुट्टे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य  3 कर्मचारी जखमी झाले आहेत. हे सर्व कृषी विभागातील कर्मचारी आहेत. मृत विकास गुट्टे हे घाटंजी येथे कृषी सहायक होते. जखमींना आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. .
VIDEO | मतदानाचं काम आटोपून परतताना एका अपघातात शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू | यवतमाळ | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Embed widget