UP Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. यामध्ये काल (गुरुवार) उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पर पडला. या पहिल्या टप्प्यात 58 विधानसभेच्या जागांवर मतदान झाले. ही मतदानाची प्रक्रिया पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पार पडली. या 58 जागांसाठी 60.17 टक्के मतदान झाले. ही मतादानाची टक्केवारी 2017 च्या तुलनेत 3 टक्क्यांनी कमी आहे. 2017 मध्ये 63.47 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी 58 पैकी 53 जागांवर भाजपने विजय मिळवला होता.
कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान?
आग्रामध्ये 60.33 टक्के
अलिगडमध्ये 60.49 टक्के
बागपतमध्ये 61.35 टक्के
बुलंदशहरमध्ये 60.52 टक्के
गौतमबुद्ध नगरमध्ये 56.73 टक्के
गाझियाबादमध्ये 54.77 टक्के
हापूरमध्ये 60.50 टक्के
मथुरेत 63.28 टक्के
मेरठमध्ये 60.91 टक्के
मुझफ्फरनगरमध्ये 65.34 टक्के
तर शामलीमध्ये 69.42 टक्के मतदान झाले.
मागील तीन निवडणुकांची टक्केवारी
काल पहिल्या टप्प्यात 11 जिह्यातील विधानसभेच्या 58 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. एकूण मतदानाची टक्केवारी ही 60.17 टक्के आहे. जी टक्केवारी 2017 च्या निवडणुकीपेक्षा 3 टक्के कमी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात 63.47 टक्के मतदान झाले होते. 2012 मध्ये 61.03 टक्के मतदान झाले होते. तर 2007 मध्ये या जागांवर केवळ 48.26 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीनंतर समाजवादी पार्टीचे मुलायम यादव सरकार सत्तेतून बाहेर पडले होते. दरम्यान, उत्तर प्रदेशातील सत्तापरिवर्तनाची दिशा ही पश्चिम उत्तर प्रदेशातून ठरत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पश्चिम यूपी हे खूप महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी पश्चिम यूपीत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासमोर आपली कामगिरी सुधारण्याचे आव्हान आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील जागांसाठीच्या प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली होती. 2017 ते 2022 पर्यंत पश्चिम उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणात बरेच बदल झाले आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे शेतकऱ्यांची भाजपवरील नाराजी. स्वतःला शेतकऱ्यांचे नेतृत्व म्हणणारे चौधरी कुटुंब यावेळी अखिलेश यादव यांच्यासोबत आहे. 58 जागांपैकी सुमारे 24 जागांवर जाट मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: