एक्स्प्लोर

शिवसेना आमदारांना 'रंगशारदा'मधून हलवण्याच्या हालचाली, हॉटेलबाहेर दोन बस उभ्या

शिवसेनेच्या आमदारांशी इतर कोणाचाही संपर्क होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची रवानगी हॉटेल रंगशारदा झाली आहे. आमदार फुटीच्या भीतीने सेनेने हे पाऊल उचलल्याचं कळतं.

मुंबई : सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. आमदार फुटीच्या भीतीच्या रंगशारदा हॉटेलमध्ये तात्पुरत्या मुक्कामाला असलेल्या शिवसेना आमदारांना तिथून हलवण्याच्या हालचारी सुरु झाल्या आहेत. दुपारपासून दोन एसी बस रंगशारदा हॉटेलबाहेर उभ्या आहेत. रंगशारदा हॉटेलमध्ये राहण्याची अडचण होत असल्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येणार आहे. मोठा पोलिस फौजफाटा इथे तैनात करण्यात आल्या आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच आमदार आदित्य ठाकरे रंगशारदामध्ये जाऊन आमदारांची भेट घेणार आहेत. सकाळपासून शांतता असलेल्या रंगशारदाबाहेर दुपारपासून हाचलाची वाढल्या. सकाळपासूनच इथे शिवसेनेच्या नेत्यांची रेलचेल वाढू लागली. परंतु आमदारांना कुठे हलवणार ही माहिती मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्यासाठी हॉटेलबाहेर बस उभ्या आहे. काही वेळातच त्यांना हॉटेलमधून दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. अनिल परब, मिलिंद नार्वेकरांच्या खांद्यावर जबाबदारी रंगशारदा हॉटेलमधील सर्व आमदारांची जबाबदारी अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर आहे. अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे जवळचे विश्वासू नेते मानले जातात. या दोघांच्या नेतृत्त्वाखाली सर्व आमदारांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येत आहे. अनिल परब यांची संपूर्ण टीम सर्व आमदारांवर लक्ष ठेऊन आहे. प्रत्येक तासांची अपडेट अनिल परब उद्धव ठाकरेंना पोहोचवत आहेत. आमदार फोडले जाऊ नये म्हणून शिवसेनेची खबरदारी शिवसेनेच्या आमदारांशी इतर कोणाचाही संपर्क होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची रवानगी हॉटेल रंगशारदा झाली आहे. आमदार फुटीच्या भीतीने सेनेने हे पाऊल उचलल्याचं कळतं. सत्ताधाऱ्यांनी सर्व पक्षांचे आमदार फोडण्याचा गेल्या काही दिवसात प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यासाठी भाजपने गुंडांचा, धमक्यांचा वापर केल्याचेदेखील राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे.. आमदार हॉटेलमध्ये का? संजय राऊत म्हणतात... शिवसेना आमदारांना सध्या मुंबईतील रंगशारदामध्ये ठेवण्यात आलं आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, "कोणताही निर्णय घेताना सगळे आमदार एकत्र असावेत म्हणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. तसंच काही नवीन आमदारांना अद्याप आमदार निवास मिळालेलं नाही. राहायची व्यवस्था नाही, त्यामुळे ते हॉटेलमध्ये एकत्र राहतील." कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न आमदार फुटीच्या भीतीने शिवसेना आमदारांना मुंबईतील रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर काँग्रेस आमदारांनाही अज्ञात स्थळी नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. याविषयी संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात पैसा आणि सत्तेद्वारे कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होण्याची भीती वाटत असेल तर ते लोकशाहीचं, पंतप्रधानांच्या स्वच्छ कारभाराच्या स्वप्नाला महाराष्ट्राने दिलेलं आव्हान आहे. पडद्याच्या मागे काय होत आहे. कर्नाटक पॅटन राबवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना. पण महाराष्ट्रात हा प्रयत्न होणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget