एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्याचं 'ते' वक्तव्य मागे घेण्यासाठी ड्राफ्ट बनवण्याची तयारी, शिवसेना-भाजपमधील तिढा सुटणार?

दिवाळीनिमित्त पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, असं वक्तव्य केलं होतं.

मुंबई : सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमधील तिढा सुटण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजपमधील वादाला निमित्त ठरलेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मागे घेण्यासाठी 'वर्षा' बंगल्यावर ड्राफ्ट बनवण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात शिवसेना नेत्यांशी संपर्क साधून कोंडी फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याचं कळतं. दरम्यान, मसुदा वगैरे काही नको, मुख्यमंत्रीपदावर बोला. आम्हाला मुख्यमंत्रीपदाचं पत्र हवं, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. दिवाळीनिमित्त पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, असं वक्तव्य केलं होतं. परंतु हे वक्तव्य शिवसेनेच्या अतिशय जिव्हारी लागलं. तेव्हापासून शिवसेनेने भाजपला चर्चेसाठी कोणताच प्रतिसाद दिलेला नाही. लोकसभेच्यावेळी जे ठरलं होतं, ते व्हावं, असं उद्धव ठाकरे वारंवार बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होण्यासाठी काही तासच शिल्लक राहिले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच माध्यमांशी बोलणार आहेत. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार? विधानसभेचा कार्यकाळ विसर्जित होणार असल्याने राजीनामा देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही

मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा

Embed widget