LIVE BLOG : विधानसभा निवडणुकीआधी राज्यात 5 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
20 Jul 2019 11:55 PM
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन जण ताब्यात, चाईल्ड हेल्पलाईनची कारवाई : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर वणी येथील चार तरुणांनी वारंवार सामूहिक बलात्कार केल्याचे यवतमाळमधील चाईल्ड हेल्पलाईनने उघडकीस आणले आहे. यापैकी दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी प्रदिर्घ काळापासून प्रलंबित मागणीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता, कोल्हापूर खंडपीठ कृती समितीने घेतली मुख्य न्यायमूर्तींची भेट, भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती शहर असल्याने कोल्हापूर खंडपीठाला सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील संघटनांचा पाठिंबा
सांगली : सांगली जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकटासह मुसळधार पावसाला सुरुवात, मिरजेतील जनजीवन विस्कळीत
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी व ज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे दीर्घ आजाराने निधन
राज्यात विधानसभा निवडणुकीआधी पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार, नागपुर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदूरबार जिल्हा परिषदांचा समावेश, महिनाभरात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश
शिर्डी : नीता अंबानी यांच्याकडून शिर्डी संस्थानला 1 कोटी 17 लाख रुपयांचे साहित्य दान, 45 लाख रुपयांचे बॅग स्कॅनर, 5 लाख रुपयांचे 55 हँड डिटेकटर आणि 15 लाख रुपयांचे 77 वॉकी टॉकी
नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच निधन, दीर्घआजाराने निधन
बुलडाणा : कार-ट्रकची समोरा-समोर धडक, कारमधील दोन जण ठार, मेहकर जालना रोडवरील बुलडाण्याच्या खापरखेड घुले शिवारातील जांभळीच्या नाल्यानजीकटी घटना, ट्रक चालक अटकेत
वेस्ट इंडीज दौऱ्यातून महेंद्रसिंह धोनीची माघार, पुढचे 2 महिने धोनी प्रादेशिक सेनेच्या सेवेत, उद्या भारतीय संघाची विंडीज दौऱ्यासाठी निवड, 3 ऑगस्टपासून भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेता प्रकाश जावडेकर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला,
मातोश्रीवर बैठक सुरू,
उद्या मुंबईत होणाऱ्या भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीआधी प्रकाश जावडेकर यांची भेट महत्वपूर्ण
रत्नागिरी : नाणार आँईल रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आज मोर्चा, प्रकल्पाच्या समर्थनार्थ व्यापारी संघाची बंदची हाक, 80 टक्के दुकाने बंद, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी रस्त्यावर, दुकाने बंद ठेवण्यासाठी बाजारपेठेतल्या दुकानदारांना आवाहन
बीड : महामार्गाच्या कडेला व्यायाम करत असताना एका भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तीन शालेय विद्यार्थी ठार झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे. ही साडेपाच वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्यातील गढी जवळ घडली. हे तीनही शालेय विद्यार्थी गेवराई तालुक्यातील तळेवाडी येथील आहेत.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी अखेर सोनभद्र हत्यांकाडातील पीडित कुटुंबांची भेट घेतली
पुणे : पुण्याच्या कात्रज परिसरात जलवाहिनी फुटली, रॅम्बो सर्कसजवळील जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी
वर्धा: नागपूर - हैद्राबाद महामार्गावर हिंगणघाट येथे वणा नदीच्या पुलाजवळ कंटेनर आणि मालवाहू वाहनाची समोरसमोर धडक,
अपघातात एक जण ठार, एक जण गंभीर जखमी
गोंदिया : - गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पात हजारो माशांचा मृत्यू, स्थानिक मासेमारी करणाऱ्या लोकांवर बेरोजगारीचे संकट
लोणावळा स्टेशनवर इंद्रायणी रेल्वेचे इंजिन फेल. सकाळी 8:10च्या सुमारासची घटना. इंजिन बदलून 9:05ला रेल्वे पुण्याकडे रवाना. कोणतीही दुर्घटना झाली नसून वाहतुकीवर ही परिणाम नाही.
कल्याणमध्ये ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, वालधुनी उड्डाणपुलावर रात्री उशिरा झाला अपघात, योगेश पवार आणि अनिल विशे अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावं
कल्याणमध्ये ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, वालधुनी उड्डाणपुलावर रात्री उशिरा झाला अपघात, योगेश पवार आणि अनिल विशे अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावं
वसमत तालुक्यातील फाटा गावात वीज पडून दोन महिला मृत्यूमुखी, लोचना काकडे , गयाबाई काकडे अशी मृतकांची नावं
पुणे-सोलापूर रस्त्यावर कारचा भीषण अपघात, पुण्यातल्या नऊ महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू, रायगडवरुन परत येत असताना काळाचा घाला
पार्श्वभूमी
1. पुणे-सोलापूर रस्त्यावर कारचा भीषण अपघात, पुण्यातल्या 9 महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू, रायगडवरुन परत येत असताना काळाचा घाला
2. चुनारच्या गेस्ट हाऊसमध्ये प्रियंका गांधीचं गेले 18 तास धरणं, सोनभद्र हत्याकांडावरुन राजकराण पेटलं, महाराष्ट्र काँग्रेसही आक्रमक
3. कर्नाटकातील राजकीय नाट्याचा नवा अंक सुरु, राज्यपालांच्या हस्तक्षेपावरुन कुमारस्वामी सर्वोच्च न्यायालयात, आता विश्वासदर्शक ठरावावर सोमवारी चर्चा
4. मुख्यमंत्रीपदी कुणाला बसवावं हे शिवसेनेनं ठरवावं, माझाला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरेंचं सूचक विधान, धुळ्यातील जनआशीर्वाद यात्रेत शक्तप्रदर्शन
5. मोठ्या प्रतिक्षेनंतर औरंगाबाद, जालना, बीड जिल्यातील बहुतांश भागात पावसाची हजेरी, बळीराजाला तात्पुरता दिलासा, सिंधुदुर्गातलही मुसळधार पाऊस
6. विंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड अखेर रविवारी होणार; महेंद्रसिंग धोनी विंडीज दौऱ्यावर जाणार की, निवृत्त होणार, उत्सुकता अजूनही कायम