LIVE BLOG : Karnataka Crises | कुमारस्वामींकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jul 2019 09:45 PM
नीलगाय आणि रानडुकरांच्या शिकारीची परवानगी देणाऱ्या अध्यादेशाला हायकोर्टाची स्थगिती,
जनावरांनी शेतीचे नुकसान केल्याच्या तक्रारीवर वन विभागाने 24 तासांत कारवाई न केल्यास शिकारीची परवानगी,
वन्यजीव संवर्धनाच्या मुद्याखाली 22 जुलै 2015 च्या सरकारी आदेशाला कोर्टाची स्थगिती
बुलडाणा : रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परची दुचाकीला धडक, दुचाकीवरील महिला जागीच ठार, गावकऱ्यांनी टिप्पर पेटवला, खामगाव ते जलंब या मार्गावरील घटना
सांगली : प्रियांका गांधीना ताब्यात घेतल्याचे सांगलीत पडसाद, संतप्त काँग्रेसने योगी सरकार विरोधात निदर्शने करत केला रस्ता रोको
भिंवडी : पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गावातील घटना
कुमारस्वामींकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, विधानसभा अध्यक्षांना आदेश देण्याचा अधिकार राज्यपालांना नाही, राज्यपालांच्या अंतिम मुदतीवर प्रश्नचिन्ह
कुमारस्वामींकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, विधानसभा अध्यक्षांना आदेश देण्याचा अधिकार राज्यपालांना नाही, राज्यपालांच्या अंतिम मुदतीवर प्रश्नचिन्ह
पिंपरी : चाकण हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा जामीन अर्ज खेड न्यायालयाने फेटाळला, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
पिंपरी : चाकण हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा जामीन अर्ज खेड न्यायालयाने फेटाळला, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
कोल्हापूर : अंबाबाईची सध्याची मूर्ती भग्न झाल्याने देवस्थान समिती ही मूर्ती बदलून दुसरी बसवणार असल्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी नवीन मूर्तीची पाहणी केल्याने या चर्चेला उधाण आलं आहे.
मुंबई महानरगपालिका आणि राज्य सरकारला हायकोर्टाचा मोठा दिलासा. #BMC च्या वृक्ष प्राधिकरण समितीला विरोध करणारी याचिका निकाली. समितीत नगरसेवक आणि जाणकारांची सदस्यसंख्या समान असण्याची आवश्यकता नाही- हायकोर्ट. वृक्षतोडीच्या परवानगीसाठी रखडलेली अनेक विकासकामं मार्गी लागणार
मुंबई महानरगपालिका आणि राज्य सरकारला हायकोर्टाचा मोठा दिलासा. #BMC च्या वृक्ष प्राधिकरण समितीला विरोध करणारी याचिका निकाली. समितीत नगरसेवक आणि जाणकारांची सदस्यसंख्या समान असण्याची आवश्यकता नाही- हायकोर्ट. वृक्षतोडीच्या परवानगीसाठी रखडलेली अनेक विकासकामं मार्गी लागणार
पिंपरी चिंचवड : बीव्हीजी कंपनीचे मालक हनुमंत गायकवाड यांची 16 कोटी 44 लाखांची फसवणूक, चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा लढवणार विधानसभा निवडणूक, नाला सापोरा विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेमधून निवडणूक लढवणार, लवकरच शिवसेनेत पक्षप्रवेश करणार
अमरावती : खुद्द कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या विहिरीतच दूषित पाणी, दूषित पाण्याने बोडेंसह इतर शेतकऱ्यांच्याही फळबागा सुकल्या
कर्नाटकाच्या राजकीय नाट्याचा आज क्लायमॅक्स होण्याची शक्यता, दुपारी दीडपर्यंत विश्वासदर्शक प्रस्ताव घेण्याची मुदत, भाजप आमदारांचं रात्रभर विधानसभेत धरणे आंदोलन

पार्श्वभूमी

 




    1. आदित्यच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान राऊतांचे संकेत, तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय उद्धव ठाकरे- अमित शाह घेतील, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया





    1. कर्नाटकाच्या राजकीय नाट्याचा आज क्लायमॅक्स होण्याची शक्यता, दुपारी दीडपर्यंत विश्वासदर्शक प्रस्ताव घेण्याचं आवाहन, भाजप आमदारांचं रात्रभर विधानसभेत धरणे आंदोलन





    1. कृत्रिम पावसाच्या प्रयोगापूर्वीच्या निरीक्षणासाठी सोलापुरात केंद्राची विमानं दाखल, तर राज्य सरकारकडूनही हालचालींना वेग, 30 जुलैपूर्वी प्रयोगाची शक्यता





    1. नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदा बरखास्त, कार्यकाळ संपल्यानंतरही निणडणुका लांबवल्यानं कारवाई





    1. टिकटॉक मोबाईल अॅपवर बंदी घालण्यासाठी मोदींना पत्र, देशविरोधी भावना भडकवत असल्याची तक्रार, तर टिकटॉकवर आक्षेपार्ह व्हीडिओ टाकणाऱ्या एजाज खानला अटक





    1. मुंबईच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक रोबो दाखल, चिंचोळ्या जागेत आग विझवण्यासाठी मदत होणार, देशातील पहिलाच प्रयोग


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.