LIVE BLOG : मुंबई : अंधेरीतील असल्फा मेट्रो स्टेशनजवळील घराचा भाग कोसळला, 3 जण अडकल्याची भीती
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
07 Sep 2019 11:58 PM
मुंबई : अंधेरीतील असल्फा मेट्रो स्टेशनजवळील घराचा भाग कोसळला, 3 जण अडकल्याची भीती
त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू वि.ल. धारुरकर यांचा कुलगुरु पदाचा राजीनामा, वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये लाच घेताना आढळले धारुरकर
पुढील चार तासांत मुंबईत हाय अलर्ट, हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज
काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी 10 सप्टेंबरला जाहीर होण्याची शक्यता, 60 उमेदवारांची पहिली यादी असण्याची शक्यता, 30 विद्यमान आमदारांना तिकीट मिळण्याचा अंदाज, मागील निवडणुकीत पराभव झालेल्या दिग्गजांना संधी मिळणार
सतेज पाटील यांची कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती
डोंबिवली : राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी शिळफाट्यावर खड्डेभरणी, काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत मनसे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी कामगारांना झापलं आणि काम बंद पाडलं, एमएसआरडीसीकडून सुरु होतं खड्डे बुजवण्याचं काम
श्रीरामपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा शिवसेनेत प्रवेश
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत असलेल्या मुंबईत मेट्रोच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार मजीद मेमन पहिल्या रांगेत, मात्र मी शरद पवारांचा निष्ठावान सैनिक असून पक्षांतर करणार नाही, मेमन यांचं स्पष्टीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींचं मिशन महाराष्ट्र
मुंबई आणि औरंगाबादमध्ये मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती
पंतप्रधान मोदींकडून पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघाच्या गणपतीचं दर्शन
औरंगाबाद : मोदींच्या सभेत आंदोलन करणाऱ्या पाच लोकांना घेतलं ताब्यात. औरंगाबाद पोलिसांनी घेतले ताब्यात. शेतकरी संघटनेचे 4 आणि एमआयएमचा एक कार्यकर्ता ताब्यात..
बदलापूर : इंद्रायणी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अंबरनाथ ते बदलापूर स्टेशनदरम्यान एक्स्प्रेस रखडली, अनेक लोकल गाड्याही अडकल्या, तर काही रद्द, नवीन इंजिन जोडून गाडी पुढे काढण्याचे काम सुरु
पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. चंद्रापासून विक्रम लँडर 2.1 किमीवर असताना संपर्क तुटला, लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, इस्रोची माहिती
2. बंगळुरुत इस्रो सेंटरवर पंतप्रधान मोदींनी उंचावलं शास्त्रज्ञांचं मनोधैर्य, देशाला तुमचा अभिमान, संपूर्ण देश वैज्ञानिकांच्या पाठिशी, पंतप्रधान मोदी देशाला संबोधणार
3. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात लावणार नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, टुरिझमला चालना देण्यासाठी 25 एेतिहासिक स्थळं भाडेतत्वावर देणार
4. विधानसभेच्या तोंडावर वंचित आघाडीत फूट,अपेक्षित जागा मिळत नसल्यानं एमआयएमचा स्वबळाचा नारा, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष
5. मुसळधार पावसामुळं नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा रद्द, मेट्रोचं लोकार्पण रखडण्याची शक्यता, मात्र मोदींचा मुंबई दौरा कायम
6. राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, पंचगंगेची पाणीपातळी वाढली, कोल्हापुरात एनडीआरएफ टीम तैनात