Raigad Crime : रायगडमधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. एका 80 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. माणगाव (Mangaon) तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या (Goregaon Police Station) हद्दीत ही घटना घडली आहे. आरोपी हमजा यासीन दाभीळकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे रायगडमध्ये (Raigad Crime) एकच खळबळ उडाली आहे. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या मनात लज्जास्पद भावना निर्माण होईल, अस कृत्य करणाऱ्या एका 80 वर्षीय व्यक्तीला रायगडच्या माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. म्हसळा तालुक्यातील संदेरी गावात राहणारा हमजा यासीन दाभीळकर याचे किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानात गेलेल्या एका तीन वर्षीय मुलीसोबत आरोपीने गैरवर्तन केले. 


आरोपी पोलिसांच्या ताब्यात


तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्यावरून तिच्यासोबत 80 वर्षीय व्यक्तीने गैरवर्तन केले. यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार मुलीने आपल्या वडिलांना सांगितला. चिमुकलीने आपबिती सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या वडिलांनी गोरेगाव पोलिसांनी ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या मेडिकल रिपोर्टनुसार संबंधित मुलीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. यानंतर आरोपीवर बाल लैंगिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी हमजा यासीन दाभीळकर याला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 


सांगलीत बापकडून पोटच्या मुलीवर अत्याचार


दरम्यान, सांगलीतील जत तालुक्यात बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडलीय. जत तालुक्यात बापाकडूनच 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या निर्दयी बापास पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सांगलीतील जत तालुक्यातील पूर्व भागांमध्ये तेरा वर्षाची पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासमवेत राहण्यास आहे. गेल्या चार महिन्यापासून तिच्या बापाकडून तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले जात होते. ही बाब आईच्या लक्षात आल्यानंतर पीडितेच्या आईने पतीला याबाबत समज देखील दिली होती. परंतु निर्दयी बापाकडून मुलीवर वाढत असणाऱ्या लैंगिक अत्याचारास अखेर पीडितेच्या आईनेच वाचा फोडली. बापाकडून वारंवार होत असलेल्या अत्याचारास वैतागलेल्या पीडितेने पोलिसात धाव घेत लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. याबाबत उमदी पोलिसांनी तातडीने नराधम बापास अटक केली असून त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



आणखी वाचा 


Justice Yashwant Varma: बंगल्याच्या स्टोअर रुममध्ये नोटांच्या पोत्यांची थप्पी जळाली, सुप्रीम कोर्टाने व्हिडिओ समोर आणताच न्यायमूर्ती यशवंत वर्मा काय म्हणाले?