Multibagger Stocks : 6 रुपयांचा शेअर 1600 रुपयांपर्यंत पोहोचला,43 हजारांची गुंतवणूक करणारे कोट्यधीश, ब्रोकरेज फर्मकडून मोठी अपडेट

विनती ऑर्गेनिक्स या कंपनीच्या स्टॉकचं ब्रोकरेज फर्म शेअर खाननं रेटिंग वाढवलं आहे. या कंपनीनं दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्यांना मालामाल केलं आहे. 16 वर्षांपूर्वी ज्यांनी या कंपनीचे 43 हजार रुपयांचे शेअर खरेदी केले असतील ते कोट्याधीश झालेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ब्रोकरेज फर्मनं विनती ऑर्गेनिक्सच्या शेअरमध्ये अजून 25 टक्के तेजी येईल असा अंदाज वर्तवला आहे. विनती ऑर्गेनिक्सचा शेअर सध्या 1599.75 रुपयांवर आहे.

20 मार्च 2009 ला या कंपनीचा शेअर 6.85 रुपयांवर होता. सध्या हा शेअर 1599.75 रुपयांवर आहे. म्हणजेच 16 वर्षापूर्वी ज्यानं 43 हजारांचे शेअर घेतले असतील त्याची सध्याची किंमत 1 कोटींच्या पुढे जाते. 9 ऑगस्ट 2024 या कंपनीचा शेअर 2331.05 रुपयांवर पोहोचला होता.
विनती ऑर्गेनिक्स कंपनी एक्रिल एमिडो टर्शियअरी- ब्यूटिल सल्फोनिक एसिड क्षमता जून 2025 पर्यंत 6000 टन करणार आहे. जोरदार मागणी आणि अमेरिकन तेल आणि गॅस सेक्टमध्ये सकारात्मक वातावरण असल्यानं कंपनी क्षमतेत वाढ करणार आहे.
विनती ऑर्गेनिक्सनं मजबूत उत्पादन स्थिती आणि कर्ज मूक्त ताळेबंद पत्रकाच्या आधारे आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 20 टक्के चक्रवाढ दरानं उत्पादन आणि नफ्यातील वाढीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं ब्रोकरेज फर्मनं या कंपनीचा स्टॉक 2000 रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)