LIVE BLOG : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची एक्सप्रेस सेवा कोलमडली

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.i

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Sep 2019 07:46 PM
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची एक्सप्रेस सेवा कोलमडली,

भुसावळ विभागातील आसवली स्टेशन जवळ मोठ्या प्रमाणात रुळावर पाणी आल्याने रेल्वे सेवा थांबावली,

यामुळे मेल एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक पूर्णतः बिघडले,

कसारा, आसनगाव या स्थानकात गोरखपूर, दुरंतो या एक्सप्रेस महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी थांबून, एकूण 5 ते 6 एक्सप्रेस बाहेर जाण्यासाठी थांबून
तर मुंबईकडे येणाऱ्या 5 ते 6 एक्सप्रेस देखील अडकल्या
उत्तम जानकरांना दहा वर्षानंतर हायकोर्टाचा दिलासा
,
'हिंदू खाटीक' जातीचं प्रमाणपत्र चार आठवड्यांत देण्याचे निर्देश
,
आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा
पनवेलमधील खेळाडूंची राष्ट्रीय सीबीएसई तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. रायगडमधल्या केएलई इंग्लिश मिडीयम स्कूलच्या स्पर्धकांनी निपाणी, बेलगाणी, कर्नाटकमध्ये झालेल्या साऊथ झोन स्पर्धेत दोन गोल्ड, एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवून दिलं होतं. पनवेलच्या अनन्या चितळे आणि मधुश दरेकर यांना सुवर्ण, पेंदात दरेकर याला रौप्य आणि स्मिथ पाटीला कांस्य पदक मिळालं. याच कामगिरीच्या पार्श्वभूमीवर त्यांची आता राष्ट्रीय सीबीएसई तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
मुंबई : उदयनराजेंच्या वक्तव्यानंतर सातारा लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीत शरद पवारांच्या नावाची चर्चा, शरद पवारांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवावी असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आग्रह, साताऱ्याचा उमेदवार ठरवण्यासाठी दुपारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत शरद पवारांसोबत बैठक, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह सातारा जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकारी बैठकीसाठी मुंबईत, उदयनराजेंना धक्का देण्यासाठी पवारांनी खेळी खेळावी असा राष्ट्रवादीतील नेत्यांचा आग्रह
पुण्यात जागावाटपावरुन आघाडीत बिघाडीची शक्यता, अजित पवारांचं जागावाटप काँग्रेसला अमान्य, अजित पवारांनी पुण्यातील चार जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याचे जाहीर केलं, काँग्रेसच्या रमेश बागवेंचा चार जागांवर दावा
पुण्यात जागावाटपावरुन आघाडीत बिघाडीची शक्यता, अजित पवारांचं जागावाटप काँग्रेसला अमान्य, अजित पवारांनी पुण्यातील चार जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याचे जाहीर केलं, काँग्रेसच्या रमेश बागवेंचा चार जागांवर दावा
BIG BREAKING : येत्या निवडणुकीत युतीचंच सरकार येणार, माथाडी कामगार मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
राजू शेट्टींना मोठा दणका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा भाजप प्रवेश करणार
मध्य प्रदेश : वायूसेनेचं मिग 21 लढाऊ विमान कोसळल, दोन्ही पायलट सुरक्षित, मध्य प्रदेशातील भिंड येथील दुर्घटना
काँग्रेसच्या तक्रारीनंतर पेट्रोल पंपावर लागलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनर्स हटवले जाणार, एसटी बस डेपो, रेल्वे स्थानक, बसेस यावरील बॅनर्सही हटवणार, काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाचा निर्णय
लातूरमध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू, मित्रांमध्ये किरकोळ वादातून गोळीबार, राहुल मनाडे मृत तरुणाचं नाव, आरोपी अमोल उर्फ गणेश गायकवाड आणि त्याचे वडील अण्णासाहेब गायकवाड यांना पोलिसांकडून अटक
93 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची का निवड केली?, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धमक्यांचे फोन, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह मिलिंद जोशी यांना 'तुमचा दुर्योधन करू तुम्हाला पाहून घेऊ' अशी धमकी
हिंगोली : 20 लाख 62 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त, हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
सांगली : कडकनाथ कोंबडी घोटाळाप्रकरणी एकाला अटक, संशयित आरोपी गणेश शेवाळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून अटक, मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते अद्याप फरार

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

1. विधानसभेच्या तोंडावर शरद पवार, अजित पवारांच्या अडचणीत वाढ, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून गुन्हा, आज बारामती बंदची हाक

2. दौऱ्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे सरकार कारवाई करतंय, शरद पवारांचा आरोप, तर कुठल्याही बँकेचा कधीही संचालक नसल्याचंही पवारांकडून स्पष्ट

3. युतीसाठी भाजपकडून शिवसेनेला 122 जागांसह विधान परिषदेच्या 3 जागा, सूत्रांची माहिती, आज नवी मुंबईत माथाडी मेळाव्यात उद्धव-फडणवीस एकाच व्यासपीठावर

4. सर्व व्यवहार बंद करत पीएमसीवर आरबीआयकडून निर्बंध, दिवसाला केवळ एकच हजार काढता येणार, संताप करत ग्राहकांचा बँकांमध्ये गोंधळ

5. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना सीनेसृष्टीतला सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांसह सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव

6. 5.8 रिश्टर स्केलच्या भूकंपानं पाकिस्तानसह उत्तर भारत हादरला, पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूरमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू, 19 जणांचा मृत्यू

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.