एक्स्प्लोर

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! आधीच्या विषय निवडीनुसार परीक्षेची अंतिम संधी

या शैक्षणिक वर्षात शाळा आणि महाविद्यालयं अद्याप पूर्ण क्षमतेनं सुरु झालेली नसून, ऐनवेळी विषय बदलून परीक्षा देणं विद्यार्थ्यांच्‍या हिताचं नाही. अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होऊन त्‍यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण केली जात होती.

मुंबई : शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता बारावीकरिता सुधारित विषय योजना आणि सुधारित मूल्यमापन योजना निश्‍चित केली आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांना ऐनवेळी विषय बदलावे लागत असून, सध्याच्‍या परिस्थितीत अध्ययनातही मर्यादा येणार आहेत. त्‍यामुळे योजनेस यंदाच्‍या वर्षापुरती स्‍थगिती देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्‍य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघ, पालक आणि विद्यार्थ्यांकडून शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर यंदा अंतिम संधी म्हणून बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या विषयांची परीक्षा देण्याची परवानगी देण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे वीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

बारावी बोर्ड परीक्षेला सुधारित विषय योजना आणि सुधारित मूल्‍यमापन योजनेच्‍या अंमलबजावणीच्‍या पहिल्या वर्षीच विद्यार्थ्यांना विषय निवडताना आणि त्‍यानुसार राज्‍यमंडळाच्‍या परीक्षेची आवेदन पत्रं भरताना अनेक विद्यार्थ्यांना अडच‍णी निर्माण झाल्‍या आहेत. याबाबतीत निर्णय निर्गमित होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी अकरावीला आवडीनुसार प्रवेश घेताना प्रचलित पद्धती, उपलब्‍ध विषय निवडलेले होते. मागील वर्षी अभ्यासलेले विषय आणि त्‍याबाबत असलेल्या आवडीनुसार, विद्यार्थ्यांनी बारावीतही मागील वर्षाचे विषय कायम ठेवले. या शैक्षणिक वर्षात शाळा आणि महाविद्यालयं अद्याप पूर्ण क्षमतेनं सुरु झालेली नसून, ऐनवेळी विषय बदलून परीक्षा देणं विद्यार्थ्यांच्‍या हिताचं नाही. अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होऊन त्‍यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण केली जात होती.

दरम्यन, पुढील वर्षापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना अशी सवलत देता येणार नाही आणि सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी सुधारित मूल्यमापन योजनेची अमलबजावणी करणं अनिवार्य असणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विद्यार्थी शिकत असलेले काही विषय माहितीअभावी बंद झालेले विषय आहेत. त्यामुळे बंद करण्यात आलेल्या विषयांचे अध्यापन तातडीनं बंद करण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या असून शिक्षण संचालक, यांनी सर्व संस्थाचालकांच्या ही बाब निदर्शास आणून देण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने केल्या आहेत.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Vikram Kale on Teachers : शिक्षकांना कुत्रे मोजायला लावता का? विक्रम काळे सभागृहात भडकले, पंकज भोयार यांनी उत्तर देत काळेंना केलं गप्प, सभागृहात नेमकं काय घडलं?
शिक्षकांना कुत्रे मोजायला लावता का? विक्रम काळे सभागृहात भडकले, पंकज भोयार यांनी उत्तर देत काळेंना केलं गप्प, सभागृहात नेमकं काय घडलं?
Chandrapur Shivsena UBT : चंद्रपुरातील शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या भेटीला; काँग्रेससोबत वाद, भाजपला सत्तेसाठी साथ, पक्षप्रमुखांकडून मातोश्रीवर कानउघडणी?
चंद्रपुरातील शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या भेटीला; काँग्रेससोबत वाद, भाजपला सत्तेसाठी साथ, पक्षप्रमुखांकडून मातोश्रीवर कानउघडणी?
Gadchiroli HSC Exam : बारावीच्या पेपरला चक्क चॅट जीपीटीवरून उत्तरे शोधत सामूहिक कॉपीचा प्रयत्न; 3 शिक्षकांसह शिपायाला निलंबित करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश
धक्कादायक! बारावीच्या पेपरला चक्क चॅट जीपीटीवरून उत्तरे शोधत सामूहिक कॉपीचा प्रयत्न; तीन शिक्षकांसह शिपायाला निलंबित करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
Embed widget