SSC Exam : छ. संभाजीनगर विभागात 629 केंद्रांवर 1.80 लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
SSC Exam : छत्रपती संभाजीनगर विभागात 629 केंद्रांवर 1.80 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर अनेक परीक्षा केंद्रावर रात्री उशिरापर्यंत परीक्षेसाठी तयारी सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
SSC Exam : दहावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून (2 मार्च) सुरुवात होत आहे. यासाठी प्रशासनाकडून देखील संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. दहावी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना देखील करण्यात आले आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) विभागात 629 केंद्रांवर 1.80 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर अनेक परीक्षा केंद्रावर रात्री उशिरापर्यंत परीक्षेसाठी तयारी सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान बोर्डाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला 2 हजार 614 शाळांतील 99 हजार 549 विद्यार्थी तसेच 80 हजार 661 विद्यार्थिनी असे एकूण 1 लाख 80 हजार 210 परीक्षार्थी 629 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. तर या परीक्षा दरम्यान प्रशासनाकडून कॉपी रोखण्यासाठी भरारी पथकासह बैठेपथक नियुक्त करण्यात आले आहे. तर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांसह महसूल पथकाची देखील या परीक्षांवर नजर असणार आहे. सोबतच प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त देखील असणार आहे.
मंडळाकडून अनेक बदल!
गेल्या दोन वेळेपासून कोरोनाची परिस्थिती असल्याने शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. ज्यात अभ्यासक्रम कमी करण्यात आला होता, सोबतच वेळ देखील वाढवून देण्यात आला होता. तर होम सेंटरचा पर्याय देखील शाळांना देण्यात आला होता. मात्र यावेळी शिक्षण मंडळाने ही सूट काढून घेतली आहे. यावेळी होत असलेल्या परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे. सोबतच होम सेंटर देखील रद्द करण्यात आले आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI