एक्स्प्लोर

उन्हाळी सुट्टी रद्द झाल्याने हिरमुसलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा, अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या शाळाच एप्रिलमध्ये सुरु राहणार, शिक्षण आयुक्तांची माहिती

Maharashtra School : एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय शिक्षण आयुक्तांनी घेतला होता, पण अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्यांचीच शाळा सुरु राहिल अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.

Maharashtra School : यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही, या कल्पनेनं हिरमुसलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल तर एप्रिल महिन्यात विनाकारण शाळा सुरु ठेवण्याची आवश्यकता नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलं आहे. ज्या शाळा कोविड काळात अभ्यासक्रम पूर्ण करू शकल्या नाहीत त्यांनाच एप्रिलमध्ये शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं, मांढरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच मे महिन्यात शाळांना सुट्टी असणार आहे. ज्यानंतर पुढील सत्र जूनच्या मध्यादरम्यान सुरु होणार असल्यानं शाळांना मे महिन्यात सुट्टी असेल. त्यामुळे मे महिन्यात सुट्टीचा कोणताही बेत आखला असेल तर तो बदलण्याची गरज नाही.   

कोरोनामुळे (Coronavirus) शालेय विद्यार्थ्यांच झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या (Summer Holiday) रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सोमवारी आली होती. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली होती. या बातमीनंतर विद्यार्थ्यांसह पालकवर्ग काहीसा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता याबाबत मांढरे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले शिक्षण आयुक्त?

सुरज मांढरे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ''ज्या शाळा कोव्हीड काळात अभ्यासक्रम पूर्ण करू शकल्या नाहीत, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एप्रिलमध्ये त्यांना शाळा सुरू ठेवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. ज्यांनी काही व्यवस्था करून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांनी विनाकारण शाळा सुरू ठेवण्याचे काहीच प्रयोजन नाही. तसेच मे महिन्यामध्ये शाळा सुरू ठेवाव्यात असे निर्देश दिले नसल्याने आणि पुढचे शैक्षणिक सत्र जूनच्या मध्यावर सुरू होणार असल्यामुळे मुलांच्या सुट्टीचेही कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे शासनाचे निर्देश नीट समजून घ्यावे.''

पहिली ते बारावी अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात

ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादांमुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षीही शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पध्दतीने सुरु झाले आहे.  ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. 

राज्यातील सर्व शाळा जानेवारीपासून सुरु  करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर आता मुंबईतील शाळा (Mumbai School) देखील 24 जानेवारीपासून सुरू  झाल्या आहेत.  कोविड एसओपीचे पालन करत शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेने स्थानिक स्तरावर पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा 24 जानेवारीपासून  सुरू करण्यासंदर्भातला निर्णय जाहीर केला होता. 

हे ही वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget