एक्स्प्लोर

Teacher In Election Duty: शिक्षकांची निवडणूक ड्युटी रद्द करा, अन्यथा मुलांना शिक्षण विभागात शिकवायला पाठवू; शिक्षक संघटनांचा इशारा

Teacher In Election Duty: शिक्षकांना देण्यात आलेली बीएलओची ड्युटी रद्द करावी अन्यथा मुलांना शिक्षणांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभागात पाठवणार असल्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.

School Teacher In Election Duty:  शासकीय शाळेतील शिक्षकांना देण्यात येणाऱ्या शिक्षणबाह्य कामांची अनेकदा मोठी चर्चा झडत असते. आता निवडणूक कामाच्या सक्तीवरुन शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिक्षकांच्या बीएलओ (Booth Level Officer) ड्युटी रद्द करा, अन्यथा मुलांना जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभागात शिकवायला पाठवू असा शिक्षक संघटनांनी इशारा दिला आहे.  शिक्षकांना तातडीने बीएलओ कामासाठी न पाठविल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवले आहे. त्यावरून आता शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. 

मुंबईतील शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओच्या नियुक्त्या दिल्याने विद्यार्थ्यांना शिकवायचं कोणी ? असा प्रश्न शाळाचालकांना पडला आहे. त्यामुळे बीएलओच्या नियुक्त्या रद्द न झाल्यास विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक कार्यालयात शिकविण्यासाठी पाठविले जाईल असा इशारा शिक्षक संघटनांकडून देण्यात आल्या आहेत. शाळांमधील सर्वच शिक्षकांना मुंबईतील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून मतदार केंद्रास्तरीय अधिकारी (बीएलओ) च्या नियुक्या स्वीकारण्याबाबत मुख्याध्यापकांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा शिक्षकांचा दावा आहे. त्यामुळे शाळेतल्या सर्वच शिक्षकांना कार्यमुक्त केल्यास शाळा कशी भरवावी ? विद्यार्थ्यांना कोणी शिकवावे ?असा प्रश्न शाळा चालकांना पडला आहे. 

मुंबई  जिल्ह्यातील जवळपास सर्व शाळांतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून काम दिले जात आहे. 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांना शिकविणे हे शिक्षकांचे प्राथमिक कर्तव्य असेही अनेक शिक्षकांनी म्हटले आहे. मुंबईतील अनेक शिक्षक रोज शाळेत येण्यासाठी आणि जाण्यासाठी म्हणून चार तासाचा प्रवास करतात. दिवसाचे 10 ते 11 तास घराबाहेर राहणाऱ्या शिक्षकांना अंशतः किंवा पूर्णवेळ बीएलओ ड्युटी देणे हे अन्यायकारक ठरेल, त्यामुळे या डीएलओ ड्युटी करून कार्यमुक्त करण्यासंदर्भात सर्व शिक्षक संघटना आक्रमक झाले असून त्या संदर्भात प्रशासनाकडे मागणी केली आहे.

मात्र, दुसरीकडे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून संबंधित शाळांना या संदर्भात पत्र पाठवून तातडीने शिक्षकांनी ज्या कामासाठी तयार राहावे असे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्याचे काम हे पूर्णवेळ करणे अपेक्षित नसून शाळेतील शिक्षणाचे काम करून उर्वरित वेळात हे काम करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, नियुक्त केलेल्या शिक्षकांनी हे काम न केल्यास किंवा कामावरून झाल्यास संबंधित शिक्षकांवर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा पत्रातून मुख्याध्यापकांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे शिक्षण वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Embed widget