एक्स्प्लोर

RTE अंतर्गत ऑनलाईन प्रवेशास सुरुवात; आर्थिक, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शाळेत मोफत प्रवेश

आरटीई अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता अर्ज सुरू

मुंबई : देशातील शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक बालकाला शिक्षणाचा (School) अधिकार मिळाला आहे. त्यामुळे, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही गरीब कुटुंबातील आणि वंचित घटकातील बालकांना मोफत प्रवेश मिळण्यासाठीच्या प्रक्रियेला यंदाच्यावर्षी सुरुवात झाली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळांमध्ये 2026-27 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. बालकांच्या पालकांना यासाठी संबंधित अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही प्रक्रिया राबविण्याबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्या असल्याची माहिती शालेय शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी दिली आहे.

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना

आरटीई अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. वंचित घटकांतील बालकांमध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), (क), (ड) इतर मागासवर्ग (ओबीसी), विशेष मागासवर्ग (एसबीसी), आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, एचआयव्ही बाधित किंवा प्रभावित बालक, अनाथ बालके, दिव्यांग बालके अथवा कोविड प्रभावित बालकांचा समावेश होतो. तर, आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. बालकांच्या पालकांना त्यांच्या निवासस्थाच्या ठिकाणापासून एक किमी पेक्षा कमी अंतरावरील शाळा (हवाई अंतर) आरटीई पोर्टलवर दिसतील. या अनुषंगाने प्रक्रियेकरिता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी आदी सूचना शिक्षण संचालनालयामार्फत देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडण्यात यावीत, अचूक माहिती भरण्यात यावी, तसेच विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी. प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्रांची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करुन समस्येचे निराकरण करता येईल, असेही शिक्षण संचालनालयामार्फत कळविण्यात आले आहे.

हेही वाचा

म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Embed widget