एक्स्प्लोर

Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती

Mhada Lottery 2026 : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यात येत आहे.

मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील ११८ सदनिका ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, यासाठी https://bookmyhome.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून सुरू होणार आहे.म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत ही संधी उपलब्ध करून देण्यात येत असून, यापूर्वी सोडतीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मात्र विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा यात समावेश आहे. इच्छुक नागरिकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.

'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्वावर १२० सदनिका विक्री करण्यासाठी दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध वर्तमान पत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. त्यानुषंगाने दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्धिपत्रक देण्यात आले. सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून https://bookmyhome.mhada.gov.in/ या म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध होईल असे नमूद करण्यात आले होते. पंरतु, तांत्रिक अडचणीमुळे सदर प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. आता नव्याने सदर प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध सदनिकांसाठी अर्जदारांनी अर्ज करण्याकरिता म्हाडाच्या https://bookmyhome.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, योजना/सदनिका निश्चिती करणे या प्रक्रियेला दि. ०४ मार्च, २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून सुरुवात होणार आहे. सदनिकेच्या विक्री किंमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा सदनिका निश्चिती केल्यानंतर ४८ तासांच्या आत अर्जदाराने करणे आवश्यक आहे.

'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर मंडळाने बांधलेल्या शिंपोली कांदिवली येथील ०८ सदनिका, चारकोप सेक्टर-८ कांदिवली येथील ०१ सदनिका, अँटॉप हिल-वडाळा येथील २७ सदनिका, तुंगा पवई येथील ४२ सदनिका, पीएमजीपी मानखुर्द येथील ०१ सदनिका, मालवणी मालाड येथील ०१ सदनिका, गायकवाड नगर मालवणी-मालाड येथील ०१ सदनिका अशा ८२ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच विकास नियंत्रण नियमावली ३३(५) (७) ५८ अंतर्गत मंडळाला प्राप्त झालेल्या सदनिकांमधून घाटकोपर पूर्व येथील ०२ सदनिका, कन्नमवार नगर विक्रोळी येथील ०१ सदनिका, अँटॉप हिल-वडाळा येथील ०८ सदनिका, भायखळा येथील ०६ सदनिका, ताडदेव येथील ०६ सदनिका, लोअर परळ येथील ०४ सदनिका, सायन येथील ०२ सदनिका, जेव्हीपीडी अंधेरी पश्चिम येथील ०७ सदनिका अशा ३६ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे, अर्जदार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. अर्जदाराने जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून मागील सलग २० वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान १५ वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र (Domicile Certificate) संगणकीय प्रणालीद्वारे ग्राहय धरले जाईल / Capture केले जाईल, याची कृपया नोंद घ्यावी. अधिवास प्रमाणपत्र हे जानेवारी २०१८ नंतर दिलेले असावे व त्यावर बारकोड असणे आवश्यक आहे. अर्जदार अविवाहित असल्यास स्वतःचे आधार कार्ड/पॅन कार्ड, अर्जदार विवाहित असल्यास पती-पत्नी यांचे आधार कार्ड/पॅन कार्ड, अर्जदार घटस्फोटीत असल्यास सक्षम न्यायालयाच्या निकालाची प्रमाणित प्रत अथवा अपील दाखल असल्यास त्याची प्रत (अंतिम निकालाच्या प्रती शिवाय सदनिकेचा ताबा देण्यात येणार नाही) आवश्यक आहे. डिक्री प्रमाणपत्राशिवाय सदनिकेचे वितरण केले जाणार नाही. आरक्षण प्रवर्गाकरिता जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असून सदर प्रमाणपत्र नसल्यास जातीचा दाखला लागणार आहे. आधार कार्डशी संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक लागणार असून अर्जदार आणि त्यांचे पती-पत्नी यांचे दोघांचे ईमेल आयडी अथवा अविवाहित असल्यास स्वतःचा ईमेल आयडी लागणार आहे.

अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारास बुक माय होमसाठी बटन दिसेल. त्यावर विंग/इमारत क्रमांक, सदनिका क्रमांक, मजला याची माहिती उपलब्ध असेल. अर्जदार त्यांना हवी असणारी सदनिका उपलब्ध असल्यास ती निवडू शकतात. अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्ज फक्त पाहता येऊ शकेल. अर्जदाराने त्याचा ऑनलाईन अर्ज ओपन करून त्यामध्ये कोणताही फेरफार करणे शक्य होणार नाही. अर्जदाराने प्रिंटेड पावतीमधील माहिती वाचून बरोबर असल्याची खात्री करावी.

सदनिका निश्चिती केल्यानंतर ४८ तासांच्या आत सदनिकेच्या विक्री किंमतीच्या दहा टक्के रक्कम भरणा आवश्यक असेल. रकमेचा भरणा केल्यानंतर ती म्हाडाकडे प्राप्त झाल्याची खात्री करून अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने सदनिकेची रक्कम भरून घेण्यासाठी तात्पुरते देकार पत्र देण्यात येईल.

अर्जदार यांनी सदनिकेची निश्चिती करण्यापूर्वी आवश्यक अनामत रक्कम व अर्ज शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे. अर्जदार यांनी अनामत रकमेचा भरणा करून सदनिका निश्चिती केल्यानंतर ४८ तासांच्या आत  सदनिकेच्या विक्री किमतीच्या १० टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. या कालावधीमध्ये अर्जदार यांनी सदनिकेच्या विक्री किमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा न केल्यास सदनिकेवरील दावा आपोआप रद्द होईल व भरलेली अनामत रक्कम संपूर्ण मंडळाकडे जमा करण्यात येईल.

अनामत रकमेचा भरणा करून अर्जदार यांना एका अनामत रकमेवर एक सदनिका एक वेळेस निश्चितीची करणे शक्य होईल यानंतर अर्जदार यांना तीच सदनिका निश्चिती करावी की झाल्यास ती सदनिका ४८ तासानंतर निश्चिती करता येऊ शकेल. परंतु, यासाठी पुन्हा अनामत रकमेचा भरणा करणे आवश्यक असेल.

जाहिरातीमधील वेळोवेळी रिक्त सदनिकांचा तपशील ऑटोमॅटिक वेबसाईटवर दिसेल या अनुषंगाने अर्जदार अर्ज करू शकतील. अर्जदार यांना सर्व रकमा एनईएफटी/आरटीजीएस/नेट बँकिंग/यूपीआय/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने करणेच आवश्यक आहे. 

सदनिकांची विक्री किंमत भरणा करावयाच्या अटी व शर्ती:-

१. अर्जदार यांनी सदनिकेची निश्चिती केल्यानंतर Online पध्दतीने सदनिकेच्या विक्री किंमतीच्या १० टक्के रक्कम ४८ तासांच्या आत भरणे आवश्यक असेल. या कालावधीमध्ये रक्कमेचा भरणा न केल्यास सदनिकेवरचा दावा आपोआप रद्द समजण्यात येईल व भरणा केलेली अनामत रक्कम मंडळाकडे जमा करण्यात येईल.

२. अर्जदार यांच्याद्वारे सदनिकेची निश्चितीकरुन सदनिकेच्या विक्री किमंतीच्या १० टक्के रक्कमेचा भरणा केल्यानंतर उर्वरित रक्कम भरण्यासाठी Online पध्दतीने तात्पुरते देकारपत्र देण्यात येईल. अर्जदार यांना तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर पुढील ९० दिवसांच्या आत उर्वरित रक्कम भरणे आवश्यक आहे. सदर कालावधीत भरणा न केल्यास अधिकतम ९० दिवसांची मुदतवाढ घेऊन नियमानुसार व्याज आकारणीसह रक्कम भरणे बंधनकारक आहे. यामध्ये कसूर केल्यास सदनिकेचे वितरण कोणतेही कारण न देता, मुदत संपताच रद्द करण्यात येईल.

३. तात्पुरते देकार पत्र दिल्यानंतर कोणत्याही कारणास्तव अर्जदाराने सदनिका नाकारली, विक्री किंमतीचा भरणा विहीत मुदतीमध्ये न केल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव वितरण रद्द झाल्यास अर्जदाराने सदनिकेच्या किंमतीपोटी भरलेल्या रकमेतून, संबधित सदनिकेच्या विक्री किंमतीच्या ०१ टक्के एवढी रक्कम समपहरण/वजावट करुन उर्वरित रक्कम कोणतेही व्याज न देता परत करण्यात येईल.

४. सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करण्यासाठी अर्जदारास वित्तिय संस्थेकडून गृहकर्ज घ्यावयाचे असल्यास अशा अर्जदारांनी ज्या वित्तिय संस्थेकडून कर्ज घ्यावयाचे आहे, त्या वित्तिय संस्थेचे Pre-Sanctioned Letter आपल्या Login ID मधुन upload करणे गरजेचे आहे. यानंतर सदर बँकेच्या   नावे व अर्जदाराच्या Login ID मध्ये कार्यालयाद्वारे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल.

५. सदनिकेच्या रकमेचा व मुद्रांक शुल्काचा भरणा केल्यानंतर सदनिकेचे वाटप व ताबा पत्र देण्यात येईल.

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने या योजनेतील सदनिकांच्या वितरणासाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी/ सल्ला देणारा वा प्रॉपर्टी एजंट म्हणून नियुक्त केलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर पैशांचा व्यवहार केल्यास त्याला मुंबई मंडळ (म्हाडा) जबाबदार राहणार नाही. तसेच अर्जदारास कोणी दलाल / व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे इ. बाबी करताना आढळल्यास म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी/प्राधिकरण यांच्याशी ०२२-६६४०५४४८ दूरध्वनी क्रमांकावर तसेच मिळकत व्यवस्थापक/पणन/ मुंबई मंडळ यांच्याशी ०२२-६६४०५१२३ दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. अर्जदारांनी अधिक माहितीसाठी ९८६९९८८००० हेल्पलाइन क्रमांकावर किंवा उपमुख्य अधिकारी (पणन), मुंबई मंडळ यांच्याशी ई-मेल: dycoem1@gmail.com वर संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापुर्वी अर्जदारांनी माहिती पुस्तिका व जाहिरात काळजीपुर्वक वाचावी, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat : अशोक खरातच्या गुहेत 'भोंदूगिरी'चं अजब साहित्य! 22 रुद्राक्षांचा डबा, हिरव्या द्रव्याची बाटली अन् बरंच काही...; खरातच्या कार्यालयातील जप्तीने पोलीसही चक्रावले
अशोक खरातच्या गुहेत 'भोंदूगिरी'चं अजब साहित्य! 22 रुद्राक्षांचा डबा, हिरव्या द्रव्याची बाटली अन् बरंच काही...; खरातच्या कार्यालयातील जप्तीने पोलीसही चक्रावले
7 मिनिटांची विक्रमी बोली अन् SOLD! 167 कोटींचा इतिहास रचला; राजा रवी वर्मांच्या यशोदा-कृष्ण’ पेंटिंगने मोडले सर्व रेकॉर्ड
7 मिनिटांची विक्रमी बोली अन् SOLD! 167 कोटींचा इतिहास रचला; राजा रवी वर्मांच्या यशोदा-कृष्ण’ पेंटिंगने मोडले सर्व रेकॉर्ड
Gold Silver Price Today: युद्धाच्या छायेत सोन्याची झळाळी फिकी, सोने तब्बल 3200 रुपयांनी स्वस्त; चांदीच्या भावातही 11,900 रुपयांची घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर
युद्धाच्या छायेत सोन्याची झळाळी फिकी, सोने तब्बल 3200 रुपयांनी स्वस्त; चांदीच्या भावातही 11,900 रुपयांची घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर
Sara Ali Khan Rents Out Mumbai Bungalow: फक्त एक डील अन् सारा अली खान झाली रातोरात कोट्याधीश; पाच वर्ष दर महिन्याला खात्यात जमा होणार इतके कोटी
फक्त एक डील अन् सारा अली खान झाली रातोरात कोट्याधीश; पाच वर्ष दर महिन्याला खात्यात जमा होणार इतके कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Garden : 'जगणं' गाडून रातोरात बगिचा, बांधला कुणी? हटवणार कोण? माहित नाही Special Report
Shivsena Politics:'डिनर'मध्ये काय शिजलं? शिवसेनेच्या मेजवानीला ठाकरेंचे २ खासदार हजर Special Report
Ashok Kharat : भोंदू खरातचं पाप सगळ्याच गुन्ह्याचा बाप! 4 वर्षात 70 कोटींची मालमत्ता Special Report
Ashok Kharat Nashik Court : अशोक खरातचे कारनामे, कुणाकुणाचे पंचनामे? Special Report
Krushna Dongaonkar on Ambadas Danve : अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Tariffs : अमेरिकेनं पुन्हा उगारले टॅरिफचे शस्त्र, परदेशी बनावटीच्या औषधांवर 100% शुल्क लादलं, धातूंवरील टॅरिफमध्ये मोठा बदल
अमेरिकेनं पुन्हा उगारले टॅरिफचे शस्त्र, परदेशी बनावटीच्या औषधांवर 100% शुल्क लादलं, धातूंवरील टॅरिफमध्ये मोठा बदल
Dhurandhar 2 Box Office Collection Day 15: 'धुरंधर 2'नं दिग्गजांना लोळवलं, बॉलिवूड-टॉलिवूडच्या भल्या-भल्या दिग्गजांना पाणी पाजलं; साऱ्यांच्या रेकॉर्ड्स चक्काचूर
'धुरंधर 2'नं दिग्गजांना लोळवलं, बॉलिवूड-टॉलिवूडच्या भल्या-भल्या दिग्गजांना पाणी पाजलं; साऱ्यांच्या रेकॉर्ड्स चक्काचूर
Raghav Chadha: 'आप'ने राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवल्यानंतर राघव चड्डा यांची पहिली पोस्ट; 'इव्हिल आय' इमोजीसह शेअर केला 2 मिनिट 45 सेकंदांचा खास व्हिडीओ
'आप'ने राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवल्यानंतर राघव चड्डा यांची पहिली पोस्ट; 'इव्हिल आय' इमोजीसह शेअर केला 2 मिनिट 45 सेकंदांचा खास व्हिडीओ
Beed Satish Bhosale : बीडमधील सतीश उर्फ खोक्या भोसलेची निर्दोष सुटका, वर्षभरानंतर तुरुंगातून बाहेर येताच मित्रांसोबत बनवली आणखी एक रील्स
बीडमधील सतीश उर्फ खोक्या भोसलेची निर्दोष सुटका, वर्षभरानंतर तुरुंगातून बाहेर येताच मित्रांसोबत बनवली आणखी एक रील्स
IPL 2026, KKR vs SRH Highlights  : सनरायजर्स हैदराबादचा 65 धावांनी दणदणीत विजय, केकेआरचा सलग दुसरा पराभव, घरच्या मैदानावर कोलकाता अपयशी  
सनरायजर्स हैदराबादचा पहिला विजय, केकेआरचा सलग दुसरा पराभव, घरच्या मैदानावर कोलकाता अपयशी  
Bollywood Actor Jeetendra Life Story: 200 फिल्म्सचा 'सुपरस्टार', सिनेमा सुपरहिट करण्यासाठी याचं फक्त नावच बास्स; पुढे, पोटचा मुलगाच ठरला 'सुपरफ्लॉप', ओळखलं का कोण?
200 फिल्म्सचा 'सुपरस्टार', सिनेमा सुपरहिट करण्यासाठी याचं फक्त नावच बास्स; पुढे, पोटचा मुलगाच ठरला 'सुपरफ्लॉप', ओळखलं का कोण?
Ashok Kharat : भोंदू अशोक खरात तपास यंत्रणांना सहकार्य करेना, दुसरीकडे पत्नी फरार; SIT ची चौकशीसाठी नवी रणनीती 
भोंदू अशोक खरात तपास यंत्रणांना सहकार्य करेना, दुसरीकडे पत्नी फरार; SIT ची चौकशीसाठी नवी रणनीती 
राज्यात तब्बल 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या एका झटक्यात बदल्या; छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी, मनपात सुद्धा नवे बाॅस
राज्यात तब्बल 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या एका झटक्यात बदल्या; छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी, मनपात सुद्धा नवे बाॅस
Embed widget