एक्स्प्लोर

Palghar : पालघरमध्ये शिक्षणावर घाला! 57 शाळांतील 9वी आणि 10वीचे वर्ग बंद; 6,500 विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

Palghar ZP School Close : कंत्राटी शिक्षकांच्या मानधनासाठी शिल्लक निधी वापरता येत नसल्याचं कारण देत जिल्हा परिषदेने पुढच्या वर्षापासून 57 शाळांमधील नववी आणि 10 वीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालघर : जिल्हा परिषद प्रशासनाच्या एका धक्कादायक निर्णयाने जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेत मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या तब्बल 57 शाळांमधील (Palghar ZP School) नववी आणि दहावीचे वर्ग पुढील शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निधीचे कारण देत हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील सुमारे 6,500 हून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निर्णयाविरोधात पालक, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

Palghar ZP School Close : ग्रामीण विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

जिल्हा परिषद प्रशासनाने कंत्राटी शिक्षकांच्या मानधनासाठी शिल्लक निधी वापरता येत नसल्याचे कारण देत हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. मात्र, या निर्णयाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. नववी-दहावीचे वर्ग बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना इतर शाळांचा पर्याय शोधावा लागणार असून अनेकांसाठी हे आर्थिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या कठीण ठरणार आहे.

Palghar ZP Student Concerns : शिक्षण अर्धवट राहण्याची भीती

जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आणि भीती निर्माण झाली आहे. नववी-दहावी हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे वर्ष आहेत. वर्ग बंद झाल्यामुळे अभ्यास बिघडेल आणि पुढे काय करायचं हेच कळत नाही, अशी प्रतिक्रिया मुलांनी दिली. 

तर पालकांनीही प्रशासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या मुलांचं शिक्षण अर्धवट राहण्याची वेळ आली आहे. दुसऱ्या ठिकाणी शाळा मिळणं कठीण आहे. प्रशासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. 

Palghar ZP Teacher Impact : शिक्षकांवरही संकट

जिल्हा परिषद प्रशासनाकडून नववी आणि दहावीचे वर्ग बंद करण्याच्या या निर्णयामुळे संबंधित शाळांमधील शिक्षकांच्या नोकऱ्यांवरही गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षक वर्गातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निर्णयाविरोधात राजकीय आणि सामाजिक स्तरावरही विरोध वाढताना दिसत आहे. अनेकांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हणत तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत कोणता तोडगा काढला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचा:

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shivendraraje Bhonsle: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना फी माफीचा जीआर, तरीही विद्यार्थ्याकडून सक्तीची फी वसुली? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून शाळांना थेट इशारा, म्हणाले...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना फी माफीचा जीआर, तरीही विद्यार्थ्याकडून सक्तीची फी वसुली? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून शाळांना थेट इशारा, म्हणाले...
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
Nagpur: 'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर
'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर
Teacher Bharti Scam: शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांची फेरपडताळणी होणार
शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांच्या नियुक्तीची फेरपडताळणी होणार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget