एक्स्प्लोर

NEET UG ची फी कुणाला परत मिळणार, पैसे विद्यार्थ्यांच्या की नेट कॅफे चालकांच्या खात्यात ? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

NEET UG : नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटल्यानं तो रद्द करावा लागण्याची नामुष्की नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर आली आहे. आता नीट यूजी परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे.

अजय धनजे, मुंबई : NEET यूजी चा पेपर लीक झाल्यामुळे NTA ने NEET UG ची तयारी करणाऱ्या देशभरातील 26 लाख विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. NTA ने RE NEET UG चा पेपर घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि परत परीक्षेचा अर्ज भरायची गरज नाही असं ट्विट मध्ये सांगितलं आहे. मात्र विद्यार्थ्यांनी NEET ची भरलेली 1700 रु फीस कुणाला परत होणार? नेट कॅफे चालकांना की विद्यार्थ्यांना, असा नवा प्रश्न निर्माण झालाय.

देशातील अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी हे डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून NEET ची तयारी करतात. या विद्यार्थ्यांना धक्का तेंव्हा बसला जेव्हा NTA जी NEET UG ची परीक्षा घेत असते त्यांनी पेपर लीक झाल्याचं मान्य केलं. आणि आम्ही RE NEET घेणार असून विद्यार्थ्यांना त्यांची फीस परत करू आणि NTA च्या रिसोर्सने पुढची परीक्षा घेऊ आणि ह्यासाठी परत अर्ज भरण्याची गरज नसणार आहे असं सांगितलं.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे 1700 रु कुणाला जाणार?

NEET UG च्या परीक्षेसाठी 1700₹ परीक्षा शुल्क आकारण्यात आले, SC आणि SC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क 900रु इतके आकारण्यात आले. आता परीक्षा रद्द झाल्यानंतर NTA ने ही फीस विद्यार्थ्यांना परत करण्याची घोषणा केली आहे. मात्र अनेक ग्रामीण भागातील आणि बहुतांश शहरी भागातील विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना नेट कॅफे, सेतू केंद्र ह्यांच्या द्वारे अर्ज भरला आहे. NEET ची फीस ही ह्याच सायबर कॅफे आणि सेतू केंद्र चालकांच्या बँक खात्यावरून भरण्यात आली आहे,  विद्यार्थ्यांनी 1700रु थेट नेट कॅफे चालकांना कॅश मध्ये दिले. आता NTA जर फीस परत करणार आहे मग 1700 रु 26 लाख विद्यार्थ्यांचे कुणाला परत होणार विद्यार्थ्यांना की नेट कॅफे चालकांना हा प्रश्न पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या समोर उभा राहिला आहे.

NTA हेल्पलाइन नंबरवर ABP माझा चा कॉल

परीक्षा शुल्क कुणाला परत होणार ह्या प्रश्नाबद्दल आमचे प्रतिनिधी अजय धनजे यांनी NTA च्या हेल्पलाइनवर कॉल केला तेव्हा त्यांना फीस विद्यार्थ्यांना परत केली जाणार आहे असं सांगण्यात आलं मात्र जेव्हा त्यांना फीस कोणाला परत करणार? विद्यार्थ्यांना की नेट कॅफे चालकांना? असा प्रश्न विचारला तेव्हा मात्र NTA चे प्रतिनिधी उत्तर देऊ शकले नाही कारण विद्यार्थांनी नेट कॅफे चालकांच्या बँक अकाउंटवरून फीस भरली आहे. लवकरच याबद्दल स्पष्टीकरण NTA द्वारे दिल्या जाईल असं NTA च्या प्रतिनिधींनी सांगितलं.

खासगी ट्युशन चालक सुद्धा चिंतेत?

आम्ही छत्रपती संभाजी नगरच्या काळे बायलॉजी क्लासेसच्या केशव काळे सरांसोबत संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा या फीस परताव्याच्या अस्पष्टीकरणामुळे चिंता व्यक्त केली. त्यांच्याकडे अनेक विद्यार्थी येत आहेत आणि सांगत आहेत की आम्ही NEET UG ची फीस ही नेट कॅफे चालकांच्या बँक अकाउंटवरून भरली आहे मग आम्हाला 1700 रुपये कसे परत होणार? काळे सरांच्या म्हणण्यानुसार देशभरातील जवळपास 70 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी NEET UG फीस ही सायबर कॅफे किंवा सेतू केंद्रावरून भरली आहे मग NTA ही फीस विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचवणार याबद्दल अजूनही पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

विद्यार्थी सेना शिक्षण विभागाला निवेदन देणारा

छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचं काम पाहणाऱ्या निखिल काकडे यांनी प्रशासनाकडे काही मागण्या केल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे...

1) सायबर कॅफेंवर कडक बंधन: सायबर कॅफे चालकांनी त्यांच्या खात्यात जमा झालेली NTA ची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात परत करणे कायद्याने बंधनकारक करावे. 

2) प्रशासकीय देखरेख पथके: मोठ्या प्रमाणावर फॉर्म भरणाऱ्या व्यावसायिक डिजिटल केंद्रांच्या बँक व्यवहारांची तपासणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget